अजितदादांचा सुप्रिया सुळे यांनी घेतला धसका, सर्व दौरे रद्द, दहा महिने बारामतीत थांबणार
supriya sule ajit pawar | पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांनी पुढील दहा महिने बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
योगेश बोरसे, सुनील थिगळे, पुणे, दि.29 डिसेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना कोडींत पकडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेचा धसका सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. पुढील दहा महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून रहाणार आहे. आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही. माझ्या कुटुंबियांना मी म्हटले आहे की, तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तुम्ही बारामतीत या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून
लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यांत होणार आहे. यामुळे आता या दोन्ही निवडणुकीत बारामतीवर लक्ष सुप्रिया सुळे यांनी केंद्रीत केले आहे. मी बारामती तळ ठोकून राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. त्यांनी आपला मुक्काम बारामतीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीमधून ते सर्व राजकीय सूत्र हलवणार आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच सामना रंगणार आहे.
कांदा प्रश्नावर टीका
केंद्र सरकारने कांद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. हा वेदना देणारा दिवस आहे. शेतकऱ्यांचे कंबरड मोडण्याचे पाप ट्रिपल इंजिन सरकार करत आहे. जेएनपीटीला अनेक शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडला आहे. त्यामुळे हे सरकार कांदा प्रश्न किती उदासीन हे समोर येत आहे. हे सरकार नाही दडपशाही आहे. महाराष्ट्रात काय व्हायचे ते दिल्लीतून ठरते. ही दडपशाहीचे सरकार आहे. या सरकारला निवडणुकाच नको आहे.