Video | दत्ता भरणे पुन्हा चर्चेत; वरातीत धरला ठेका

इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे (NCP MLA Datta Bharane) हे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्याला कारण देखील तसेच आहे. दत्तात्रय भरणे यांनी एका लग्नात नवरदेवासोबत ठेका धरला. हा व्हिडीओ (Video) समोर आल्यानंतर भरणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Video | दत्ता भरणे पुन्हा चर्चेत; वरातीत धरला ठेका
दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:16 PM

पुणे : इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे (NCP MLA Datta Bharane) हे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्याला कारण देखील तसेच आहे. दत्तात्रय भरणे यांनी एका लग्नात नवरदेवासोबत ठेका धरला. हा व्हिडीओ (Video) समोर आल्यानंतर भरणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदापूरमध्ये आज नगरसेवक स्वप्नील राऊत (Swapnil Raut) यांच्या पुतणीचे लग्न होते. या लग्नाला भरणे यांनी हजेरी लावली. या लग्नाला दत्तात्रय भरणे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी भरणे यांना नवरदेवाच्या वरातीत नाचण्याचा अग्रह धरला. भरणे यांनी देखील उत्साह कायम ठेवत गाण्यावर ठेका धरला. भरणे यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायर झाला असून, इंदापूरकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

पदाधिकाऱ्यांकडून आग्रह

संबंधित व्हिडीओ हा इंदापूरमधील आहे. इंदापूरमधील नगरसेवक स्वप्नील राऊत यांच्या पुतणीचे लग्न होते. वधू वराला अर्शीवाद देण्यासाठी दत्तात्रय भरणे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दत्तात्रय भरणे यांच्यासोबतच नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, अमर गाडे, स्वप्नील राऊत, व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, वसीम बागवान हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भरणे हे नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये देखील सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भरणे यांना नाचण्याचा अग्रह केला. भरणे यांनी देखील उपस्थितांची निराशा न करता गाण्यावर ठेका धरला.

व्हिडीओमुळे भरणे पुन्हा चर्चेत

खुद्द दत्तात्रय भरणे यांनी गाण्यावर ठेका धरल्याने उपस्थितांचा देखील उत्साह चांगलाच वाढला. दत्तात्रय भरणे यांच्यासोबत इतर पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी झाले. या व्हिडीयोच्या निमित्तान पुन्हा एकदा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे चर्चेत आले आहेत.

संबंधित बातम्या

फडणवीस म्हणतात महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, कुणी अडवले कार्यक्रम?

सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?

Video | धनंजय मुंडेंचा स्क्वेअर कट पाहिलात का? सरपंच प्रीमिअर लीगमध्ये कुटल्या 7 चेंडूत 11 धावा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.