Pune : राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई!

सेक्सटॉर्शनसारख्या प्रकरणांंमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला सेक्सटोर्शनमध्ये जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

Pune : राष्ट्रवादीचा 'हा' आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:52 PM

पुणे : सोशल मीडियामुळे कोणाशीही सहजपणे संपर्क साधणं अगदी सहज झालं आहे. मात्र याचा काही समाजकंटक चुकीच्या पद्धतीने फायदा घेतात. सेक्सटॉर्शनसारख्या प्रकरणांंमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला सेक्सटोर्शनमध्ये जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या आमदाराकडे 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण? सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. आरोपीने माने यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर मानेंना अश्लील मेसेज पाठवण्यात आले. इतकंच नाहीतर त्यांना अश्लील मेसेजनंतर व्हिडीओ कॉल केले. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांना भूरळ पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आरोपीने माने यांच्याकडे खंडणीची मागणी केली, 1 लाख रुपयांची खंडणी त्याने मागितली. जर खंडणी दिली नाही तर अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर माने यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुणे सायबर पोलिसांनी आपली सुत्रे हलवत आरोपीच्या परराज्यात असताना मुसक्या आवळल्या. आमदार माने यांना सेक्सटोर्शनच्या जाळ्यात ओढणाऱ्या आरोपीचं नाव रिझवान अस्लम खान असं आहे.

पुणे सायबर पोलिसांनी रिझवान अस्लम खानला राजस्थानमधील भरतपूरमध्ये अटक केली. आरोपीकडून 4 मोबाईल आणि 4 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये 90 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. आरोपी रिझवान खान याला पुणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सेक्सटॉर्शन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण समोरल आली आहेत. डिजीटल युगामध्ये सर्वांनी अशा गोष्टींपासून सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.