Sharad pawar-Ajit pawar | अजित पवारांबरोबर भेट झाल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Sharad pawar-Ajit pawar | राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली. शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु झालेत. कारण अजित पवार थेट दिल्ली रवाना झालेत.

Sharad pawar-Ajit pawar | अजित पवारांबरोबर भेट झाल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
ajit pawar sharad pawar ncp
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 3:33 PM

पुणे : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली. पुण्यात बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधु प्रतापराव पवार यांचं निवासस्थान आहे. तिथे शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबातील अन्य सदस्य आले होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी शरद पवार यांना गाठलं. शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीबद्दल विचारलं, त्यावेळी ते म्हणाले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो” अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या दिल्लीत दौऱ्याबद्दल बोलणं शरद पवार यांनी टाळलं.

प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरवर्षी दिवाळीत बारामतीत गोविंद बाग येथे पवार कुटुंब एकत्र येतं. तिथे पवार कुटुंबीय सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारतात. गाठी-भेटी होतात. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत बरी नाहीय. त्यांना गोविंद बागेत येणं जमणार नाहीय, म्हणून पवार कुटुंब आज प्रतापवार पवारांच्या निवासस्थानी जमलं होतं, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रतापराव पवार हे शरद पवार यांचे चुलत बंधू आहेत. विशेष म्हणजे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील

अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झालेत. अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली? दिल्ली भेटीचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने शरद पवार गटापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.