शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांचा वेगळा सूर, दिला मोदींना पाठिंबा

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अधूनमधून आपली वेगळी भूमिका मांडत असतात. आता पुन्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले अन् शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सूर लावले. यामुळे चर्चा सुरु झालीय.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांचा वेगळा सूर, दिला मोदींना पाठिंबा
ajit pawar sharad pawar supriya sule
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 9:42 AM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाले. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेससह १९ पक्षांनी बहिष्कार घातला होता. त्यावरून वाद सुरु होता. आता उद्घाटनानंतर वैदिक रिती रिवाजानुसार कार्यक्रम घेतल्यामुळे वाद सुरु झाला आहे. शरद पवार यांनी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली. शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांनी तिच भूमिका मांडली.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की. ‘जुनी वास्तू मला प्रिय आहे. त्या वस्तूच्या भिंती बोलक्या आहेत. देशातील मोठमोठ्या लोकांनी इथंच बसून काम केलं आहे. देशाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय याच संसदेत घेण्यात आले आहेत. या जुन्या इमारतीशी माझं भावनिक नातं आहे.’, असे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते शरद पवार

मोदी सरकार आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, हा कार्यक्रम मी एक-दोन तास पाहिला. मी या कार्यक्रमाला गेलो नाही हे बरे वाटले. तिथे धार्मिक कार्यक्रम केले गेले. यामुळे नेहरूंची आधुनिक भारताच्या संकल्पनेस धक्का बसत आहे. हे चिंताजनक आहे. आपला देश गेल्या अनेक वर्षांपासून मागे जात आहे.

आता अजित पवार म्हणाले

अजित पुढे म्हणाले, आता या नव्या संसद भवनात सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. अजित पवार म्हणाले, याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. जुनी संसद ब्रिटिशांनी बांधली होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभा इमारती बांधल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची नवीन इमारत असावी, अशी चर्चा सध्या आहे. संसदेची जुनी इमारत बांधली तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती. आता आम्ही 135 कोटींचा आकडा पार केला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधीही वाढले आहेत. मला व्यक्तिशः असे वाटते की या नवीन इमारतीची गरज होती. कोरोनाच्या काळात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केले आणि शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले.

हे ही वाचा

नवीन लोकसभा…तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील…काय आहे हा बदल

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.