लोकलला 98 वर्षांनंतर मिळणार पर्याय, पुणे-मुंबई दरम्यान धावणार वंदे मेट्रो

वंदे मेट्रोमध्ये इंटरसिटी गाड्यांप्रमाणे फक्त आठ ते दहा डबे असतील. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग 120 ते 130 असेल. जवळच्या स्थानकांमधून ते थोड्याच वेळात शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचेल.

लोकलला 98 वर्षांनंतर मिळणार पर्याय, पुणे-मुंबई दरम्यान धावणार वंदे मेट्रो
वंदे मेट्रो ट्रेनचे प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:47 AM

पुणे : देशात पहिली लोकल मुंबईत 3 फेबुवारी 1925 मध्ये धावली होती. आता त्यानंतर 98 वर्षांनंतर लोकलसाठी पर्याय तयार करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेससारखी दिसणारी वंदे मेट्रो (Vande Metro) पुणे-मुंबई दरम्यान लवकरच धावणार आहे. यामुळे पुणेकर आणि मुंबईकरांना उपनगरीय प्रवासाचा वेगळा अनुभव येईल. तसेच कमी वेळेत त्यांना हे अंतर गाठता येणार आहे.  आता लोकलसाठी केलेले ‘इएमयू’ व ‘डेमू’च्या रेकचे उत्पादन बंद होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहे. रेल्वेने सेमी हायस्पीड ट्रेन सुरु केली आहे. बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. आता कमी अंतर जलदगतीने करण्यासाठी वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो ट्रेन सुरु करणार आहे. यामुळे लवकरच लोकलच्या जागी वंदे भारत एक्स्प्रेससारखी दिसणारी ‘वंदे मेट्रो’ धावणार आहे. ही ट्रेन पुणे मुंबई दरम्यान धावणार आहे.

हे सुद्धा वाचा

2023 पर्यंत रुळांवर

वंदे मेट्रो ही स्वदेशी ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात होईल. वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन मे-जूनपर्यंत समोर येईल. ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी क्रांतिकारी बदल ठरेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले. वंदे मेट्रो ट्रेन 1950 आणि 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेईल.

कशी असणार ट्रेन

वंदे मेट्रोमध्ये इंटरसिटी गाड्यांप्रमाणे फक्त आठ ते दहा डबे असतील. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग 120 ते 130 असेल. जवळच्या स्थानकांमधून ते थोड्याच वेळात शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. मेट्रोप्रमाणेच यात स्वयंचलित दरवाजे, एलईडी स्क्रीन असतील.

माथेरान-नेरळ हायड्रोजन ट्रेन धावणार

वंदे भारतनंतर आता देशात हायड्रोजन रेल्वे सुरु होणार आहे. वर्षभरात देशांतील ८ ‘नॅरोगेज’ मार्गावर हायड्रोजन रेल्वे सुरु होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात हायट्रोजन ट्रेन ब्रॉडगेज मार्गावर धावणार आहे. या रेल्वेमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत डब्याचे प्रोटोटाइप तयार करण्यात येणार आहे. माथेरान-नेरळ, दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे, कलका-शिमला, कागडा घाटी, निलगिरी माउंटन रेल्वे, बिलमोरा वाघई, मदू पाताळपाणी, मारवाड देवगड मडरिया या आठ मार्गांवर हायड्रोजन रेल्वे धावणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.