Nitin Gadkari : आता गाडी 100 टक्के इथेनॉलवर चालणार! पेट्रोल-डिझेलबाबत पुण्यातल्या साखर परिषदेत काय म्हणाले नितीन गडकरी?

आपल्या देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाही. साखरचे काही होवो, मात्र उसाचे भाव कमी होणार नाहीत. मात्र साखरेचे भाव कमी होऊ शकतात, असे नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : आता गाडी 100 टक्के इथेनॉलवर चालणार! पेट्रोल-डिझेलबाबत पुण्यातल्या साखर परिषदेत काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 1:24 PM

पुणे : शेतकरी आणि कारखानदारांनी आता इथेनॉलचे (Ethanol) पंप टाकावेत. कारण गाडी 100 टक्के इथोनॉलवर चालणार आहे. सर्वच पंपांवर इथेनॉल पंप सुरू केले पाहिजेत, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथील राज्यस्तरीय साखर परिषदेत त्यांनी हे मत मांडले आहे. पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel) आता संपणार आहे. आत्मनिर्भर भारतात याची गरज आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे. पेट्रोल डिझेल संपणार असून त्याऐवजी ग्रीन हायड्रोजन येणार आहे. पाणी आणि बायो मासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होते. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाले तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असेही ते म्हणाले.

‘अजित पवारांनी पुढाकार घ्यावा’

पुढे ते म्हणाले, की याविषयी नवीन पॉलिसी आणत आहोत. इथेनॉलचे पंप सुरू करण्यासाठी अजित पवार आपण पुढाकार घ्यावा. पुण्यापासून त्याची सुरुवात करावी. त्यामुळे पुण्यातील प्रदूषणही कमी होणार आहे. त्यानंतर सातारा आणि इतर जिल्ह्यात करू असा उपक्रम सुरू करता येवू शकतो.

‘पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल’

आपल्या देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाही. साखरचे काही होवो, मात्र उसाचे भाव कमी होणार नाहीत. मात्र साखरेचे भाव कमी होऊ शकतात. साखरेचे उत्पादन असेच राहिले तर करखानदारांना आणि ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, 15 वर्ष कारखाने चालवून आमच्या हातात काहीच आले नाही. जावे ज्यांच्या जन्मा तेव्हा कळे, असेही गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘लवकरच इलेट्रिक टॅक्टर, ट्रक आणणार’

आज रोज रस्ते वाढत आहेत. याचे कारण गाड्यांची संख्यापण वाढत आहे. आता लवकरच इलेट्रिक टॅक्टर, ट्रक आणणार आहोत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. तर फ्लेक्स इंजिनमध्ये 100 टक्के पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉल टाकता येवू शकते. ऑटोमोबाइल कंपन्यांनी अशाप्रकारचे इंजिन तयार करावे, यासाठी आग्रह करत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.