Nitin Gadkari : पुण्याच्या शिरुर ते वाघोलीमध्ये तीन मजली रस्ता बांधणार, नितीन गडकरींनी प्लॅन सांगितला
पुण्यात शिरूर ते वाघोली मोठा रस्ता बांधणार आहे. तो तीन मजली असणार आहे. 15 हजार कोटी चा हा रस्ता असणार आहे.तळेगांव-चाकण रस्त्यावर देखील करण्याचा विचार सुरू आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पुण्यातील (Pune) किवळे येथे अल्ट्रा हाय परफॉरमन्स काँक्रिट प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी विविध मुद्यावर भाष्य केलं. आपल्या सर्वांचा उद्देश हा आहे की बांधकामाचा खर्च कमी करणं आणि बांधकामाचा दर्जा वाढवणं. समुद्रात, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीत जे पूल बांधतो त्यांच्या दोन खांबामधील अंतर 30 मीटर असतं. मलेशियातील एका कंपनीचे लोक मला भेटले त्यांनी मला दोन्ही पिलरमधील अंतर 120 मीटर करु शकतो. त्यानंतर मी आयआयटी मुंबईचे रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक गट मलेशिया आणि सिंगापूरला पाठवला, त्यामध्ये सबनीस होते. यानंतर हे आपल्याला शक्य आहे हे सांगितलं. सत्यजीत निंबाळकर यांनी हा प्रयोग यशस्वी केला, असं नितीन गडकरी म्हणाले. शिरुर ते वाघोली (Shirur to Wagholi) येथे तीन मजली पूल बांधणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. तो प्रकल्प 15 हजार कोटी रुपयांचा असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
शिरुर ते वाघोली तीन मजली रस्ता बांधणार
शिरुर ते वाघोली येथे आठ लेन रस्ता, वरती सहा लेनचा ब्रीज आणि त्यावर सहा लेनचा ब्रीज आणि त्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसीटी असा प्लॅन असणार आहे. यामुळं बांधकाचा खर्च कमी होईल आणि दर्जा सुधारेल. तळेगाव आणि चाकण रस्त्यावर हा प्रकल्प करण्याचा विचार आहे. ब्रह्मपुत्रा नदीत देखील सर्बानंद सोनेवाल यांच्या मतदारसंघातील तो प्रकल्प होता. प्रकल्पाची किंमत 6 हजार कोटी होती. आम्ही तंत्रज्ञानात बदल केले आणि त्यानंतर तो प्रकल्प 680 कोटी रुपयात होतं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
पाहा व्हिडीओ
जे नवीन असेल ते स्वीकारलं पाहिजे
पुण्यात शिरूर ते वाघोली मोठा रस्ता बांधणार आहे. तो तीन मजली असणार आहे. 15 हजार कोटी चा हा रस्ता असणार आहे.तळेगांव-चाकण रस्त्यावर देखील करण्याचा विचार सुरू आहे. नवीन जे आहे ते स्वीकारलं पाहिजे हे तंत्रज्ञान मेट्रो सह विविध ठिकाणी वापरण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाचं आणि ज्ञानाचं संपत्तीत रुपांतर करण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
देशात 50 ते 60 फॅक्टरी उभारण्याची गरज
अल्ट्रा हाय परफॉरमन्स काँक्रिट प्रकल्पासारखे कारखाने सर्व राज्यात उभारायचे आहेत या तंत्रज्ञानामध्ये फायबर स्टीलचा वापर सुरू आहे,कारण स्टील च्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे,ह्या तंत्रज्ञानाची मागणी वाढली तर सिमेंट आणि स्टील च्या किमती कमी होतील असा विश्वास आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. देशात अनेक ठिकाणी आणि अनेक राज्यात असे प्रकल्प उभारण्यात येतील. 50 ते 60 फॅक्टरी उभारल्या तर फायदा होणार आहे. स्टील फायबर वापरलं जाणार आहे. स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणार आहोत. नवीन पर्याय नक्कीच दर कमी करतील.
इतर बातम्या :
भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप करुन सरकारची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न : दिलीप वळसे पाटील
मोबाईलवर बसला म्हणून विकलांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?