Rain : राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने अनेक ठिकाणी विश्रांती घेतली आहे. राज्यात सोमवारी कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही.

Rain : राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:35 AM

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे. सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु विदर्भातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे, याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केलाय.

कसा असणार पाऊस

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.

हे सुद्धा वाचा

मुंबई, पुणे धरणसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा झाला आहे. परंतु पाणी कपात कायम राहणार आहे. पावासाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून ही काळजी घेतली जात आहे. बदलापूरचे बारवी धरण ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या ८ दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भीमा नदी पात्रात विसर्ग

पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण पूर्ण भरले आहे. या धरणाच्या दोन दरवाजेद्वारे 1096 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून 500 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई – हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. या ठिकाणी निळवंडे धरण 82 टक्के भरले आहे.

Non Stop LIVE Update
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.