Paramedical student: पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; पदवीपूर्ण विद्यार्थ्यांची नोकरीसाठी दाहीदिशा; शासनाने जागा भरल्याच नाहीत

पॅरामेडिकल महाविद्यालयाच्या हजारो रुपयांची फी भरुनही प्रत्यक्ष मात्र पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत तर कधी शिक्षक असले तर योग्य अध्यापन केले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे.

Paramedical student: पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; पदवीपूर्ण विद्यार्थ्यांची नोकरीसाठी दाहीदिशा; शासनाने जागा भरल्याच नाहीत
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:15 AM

मुंबईः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत (Maharashtra University of Health Sciences) 2013 साली महाराष्ट्रात ठिकठिकाणी पॅरामेडिकल म्हणजेच अचिकित्सालयीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली. डॉक्टरांशी संलग्न असलेली व वैद्यकीय सेवेशी निगडित असलेले संमातर बळ म्हणजेच पॅरामेडिकल फोर्स. हे अद्यायवत ठेवणे महाराष्ट्र शासनाला गरजेचे असतानाही मात्र महाराष्ट्र सरकारकडून पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या (Paramedical Student) तोंडाला पानं पुसण्याचे काम करण्यात येत आहे. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने पॅरामेडिकल क्षेत्रामधील ऑपरेशन थेटर तंत्रज्ज्ञ, एन्डोस्कोपी तंत्रज्ज्ञ, डायलिसिस तंत्रज्ज्ञ, अत्यावश्यक मेडीकल सेवा, ब्लड बॅक तंत्रज्ज्ञ, फरफ्युजिनस्ट तंत्रज्ज्ञ (Technician) यापैकी एकही पद आजपर्यंत भरले गेले नाही. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारीक विभागाला मोठा ताण सहन करावा लागत आहे. पॅरामेडिकलमधील एकही जागा भरली गेली नसल्याने मनुष्यबळा अभावी रूग्णांना योग्य ती सेवा देताना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे.

ज्या प्रमाणे शासनाने पॅरामेडिकलच्या जागा भरल्या गेल्या नाहीत त्याच प्रमाणे पॅरामेडिकले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणातही अनेक समस्या निर्माण होत आहेत.

शिक्षण घेतानाही समस्या नंतर अडचणी

पॅरामेडिकल महाविद्यालयाच्या हजारो रुपयांची फी भरुनही प्रत्यक्ष मात्र पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत तर कधी शिक्षक असले तर योग्य अध्यापन केले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे.

विद्यावेतनानीच विद्यार्थ्यांची मागणी

आजपर्यंत अनेक विद्यार्थी पॅरामेडिकलची पदवी पूर्ण केल्यानंतर सरकारी रूग्णालयांमध्ये कधी दिवसा तर कधी रात्री सांगितलेल्या वेळेत अविरतपणे रूग्णांना 1 वर्षे इंटर्नशिप केली जाते. या कालावधीत विद्यार्थ्यांना वेळेवर झोप नाही, वेळेवर जेवण मिळत नाही त्यामुळे पॅरामेडिकलच्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची समस्याही निर्माण होत आहे. त्यामुळे पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयामधून दोन वेळचे जेवण व विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शासनाकडून नोकरभरतीच नाही

शासनाकडून पॅरामेडिकलच्या जागा भरल्या गेल्या नसल्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आरोग्य मंत्री , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आता तरी या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार का असा सवाल पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.