AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आज ‘जंगली महाराज रोड’, ‘फर्ग्युसन रोड’, ‘महात्मा गांधी रोडवर ‘नो व्हेईकल झोन’

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच संकटामुळे ओस पडलेले लोणावळा पर्यटनस्थळ गजबजलेले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेत. लोणावळ्यातील प्रसिद्ध असा टायगर आणि लायन्स पॉईंट वर पर्यटकांनी गर्दी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना आणि ओमीक्रोन च संकट आल्याने प्रशासनाने पुन्हा निर्बंध लावले आहेत.

पुण्यात आज 'जंगली महाराज रोड', 'फर्ग्युसन रोड', 'महात्मा गांधी रोडवर 'नो व्हेईकल झोन'
police
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:12 PM

पुणे- शहरात 31  डिसेंबर वर्षअखेर व नववर्षाचे स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रस्त्यावर 31 डिसेंबरला सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे.

गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य गेट, झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) दरम्यान वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे . या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात येईल

वाहतुकीत करण्यात आलेले बदल

पुणे कॅम्प भागात आज (31) डिसेंबरला सायंकाळी सात वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत करण्यात येणारे वाहतुकी वळवण्यात आली आहे. यावेळी वाहतूक वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे . ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात आली आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून यावरील वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात आली आहे. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीटरोडमार्गे पुढे सोडण्यात आली आहे.

शिवाजी रोडवरील वाहतुकीत बदल

शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे 1  जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा गर्दी संपेपर्यंत शिवाजी रोडवर चार चाकी वाहने व सर्व प्रकारच्या बसगाड्यांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

नव वर्षाच्या स्वागत लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच संकटामुळे ओस पडलेले लोणावळा पर्यटनस्थळ गजबजलेले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेत. लोणावळ्यातील प्रसिद्ध असा टायगर आणि लायन्स पॉईंट वर पर्यटकांनी गर्दी झाली आहे. मात्र पुन्हा कोरोना आणि ओमीक्रोन च संकट आल्याने प्रशासनाने पुन्हा निर्बंध लावले आहेत. सर्व नियम पाळत नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

Satish Sawant | साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचा कौल, ईश्वरचिठ्ठीने सतीश सावंत यांचा पराभव

Positive News | चार कृषी विद्यापीठांच्या 193 शिफारशींना मान्यता, यांत्रिकिकरणावर विद्यापीठांचाही भर

Vijay Wadettiwar | जनतेनं निर्बंधांचं पालन केलं नाहीतर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – विजय वडेट्टीवार

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.