Pune News | पुणेकर मुलाची कमाल, इंजिनिअर नसूनही Google मध्ये मिळाला तब्बल इतक्या लाख पगाराचा जॉब

Pune News | डोळे विस्फारतील इतका पगाराचा आकडा. कशी मिळवली त्याने ही नोकरी? दुसरी यशोगाथा नाशिकच्या मुलाची. त्याला अॅमेझॉनमध्ये 1.25 कोटी रुपये पगाराची नोकरी मिळाली आहे.

Pune News | पुणेकर मुलाची कमाल, इंजिनिअर नसूनही Google मध्ये मिळाला तब्बल इतक्या लाख पगाराचा जॉब
Pune student bags job at Google
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 11:49 AM

पुणे : गुगलमध्ये नोकरी मिळवणं सोप नाहीय. हुशार, उच्चशिक्षित मुलांची गुगलमध्ये निवड होते. पुण्यातील एका मुलाने ही कमाल करुन दाखवली आहे. हर्षल जुईकर असं या मुलाच नाव आहे. पुण्यातील या विद्यार्थ्याने लक्षणीय यश मिळवलं आहे. त्याने गुगलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवली आहे. महत्वाच म्हणजे इंजिनिअरींगची पदवी नसताना, त्याने ही नोकरी मिळवलीय. हर्षल जुईकरच कौशल्य आणि निर्धार या बळावर त्याला ही नोकरी मिळालीय.

हर्षलचा जन्म मुंबईत झाला. तो लहानाचा मोठा याच शहरात झाला. हर्षलने इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली नाही. इंजिनिअरींगची पार्श्वभूमी असलेल्या मुलांनाच टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराचे जॉब मिळतात. हे एक बनलेलं समीकरण आहे, ज्याला हर्षल जुईकरने छेद दिला. हर्षल जुईकरची स्टोरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

हर्षलच्या कौशल्याने प्रभावित

तुमच कौशल्य, तळमळ आणि एखाद्या कामाबद्दलची प्रचंड आवड याला सीमा नसते. हर्षलकडे कॉम्प्युटर कोडींग आणि प्रोग्रॅमिंगमध्ये टॅलेंट होतं. सततच्या शिकण्यामुळे त्याच्या कौशल्यात सुधारणा झाली. त्याने त्याच एक्सपर्ट स्कील दाखवून दिलं. अखेरीस गुगलमध्ये नियुक्ती करणाऱ्यांच लक्ष त्याने वेधून घेतलं. ते सुद्धा हर्षलच्या कौशल्याने प्रभावित झाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

कल्पक आयडीया आणि टॅलेंटच्या शोधात

गुगल कंपनी सतत कल्पक आयडीया आणि टॅलेंटच्या शोधात असते. हर्षल जुईकरच कोडींगच कौशल्य, त्याची क्षमता पाहून ते प्रभावित झाले. त्याच्या टॅलेंटची दखल घेतली व त्याला आकर्षक पॅकेजची नोकरी ऑफर केली.

नाशिकच्या मुलाला अॅमेझॉनमध्ये 1.25 कोटी पगाराची नोकरी

दुसरी यशोगाथा IIIT अलहाबादची आहे. अनुराग माकाडे या टेक विद्यार्थ्याने ई-कॉर्मस क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉनमध्ये नोकरी मिळवली आहे. अनुराग माकाडे मूळचा नाशिकचा आहे. त्याला 1.25 कोटी पगाराच्या नोकरीची ऑफर आहे. अॅमेझॉनच्या आयर्लंड डबलिन येथील शाखेत तो इंजिनिअर म्हणून काम करेल. अनुराग माकाडेने सोशल मीडियावरुन त्याचा आनंद, उत्साह व्यक्त केला. “फ्रंटेड इंजिनिअर म्हणून मी अॅमेझॉनमध्ये रुजू होणार ही आनंदाची बाब आहे” असं तो म्हणाला. याआधी बंगळुरु येथील कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.