खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, बच्चू कडू संवेदनशील राजकारणी, कारण काय?

कोणी आंदोलन कसं करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, बच्चू कडू संवेदनशील राजकारणी, कारण काय?
सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 3:47 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुलीच्या आवाजातली एक क्लीप माझ्याकडं आली. ही क्लीप फार वेदनादायी होती. इतरांना हा व्हिडीओ दाखवा, असं त्यात म्हटलं होतं. शेतकरी किती अडचणीत आहे, हे दाखविणारा हा व्हिडीओ होता. कोविडच्या काळात सगळे लोकं लॉकडाऊनमध्ये होते. एक व्यक्ती सातत्यानं बांधावर काम करत होती, ती म्हणजे या बांधावरला शेतकरी. कोविड काळात अनेक गोष्टी कमी पडल्या. पण, अन्न अजिबात कमी पडलं नाही. यांचं श्रेय काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला जातं.

कोणी आंदोलन कसं करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण, आंदोलन कोण कसा करणार, याच्यावर टीका होत असेल तर हे दुर्दैवी आहे. वास्तवतेपासून किती दूर असणारे लोकं आहेत, हेच यातून आपल्याला दिसते, असंही त्यांनी सांगितलं.

जे वाचतो, ऐकतो, त्यातून समाजात चर्चा होते. बच्चू कडू हे संवेदनशील नेते आहेत. 50 खोकेचा आरोप झाला. मंत्री म्हणाले, तुम्हाला 50 खोके हवे आहेत, का. यावरून ही ऑफर आली असावी, असा अंदाज येतो. त्यामुळं लोकांच्या मनात याबाबत शंका आली असावी. त्यामुळं सातत्यानं 50 खोकेची चर्चा होते.

गाव, वाडी, वस्तीवर ही चर्चा व्हायला लागली. त्यामुळं ते म्हणतात, ताई हे बघा, हे 50 खोकेवाले आहेत. ही गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेली गोष्ट आहे. या राज्यात कोणीतरी सत्तेत असलेलं संवेदनशील आहे, याचा मला आनंद होत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बच्चू कडू यांचं आभार मानते. त्यांनी आरोग्यामध्ये अपंगांसाठी प्रचंड काम केलं. त्यांच्या वेदना त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यातून दिसून येतो. कोणीतही संवेदनशील राजकारणी या राज्यात आहेत. तेही सत्तेतले आहेत.

असंवेदनशील सरकार आहे. मंत्रालयात येऊन आढावा घेतला जावा. मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्या. किती दिवस हे सरकार मंत्रालयात होतं. जिल्ह्याधिकाऱ्यांचा किती वेळा रिव्हीव्ह घेतला गेला. दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ते दर शुक्रवारी सकाळी सात वाजता मिटिंग घ्यायचे. अशाप्रकारे मिटिंग होताना मला कुठं दिसत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.