पुण्यात लसीकरणाचा वेग मंदावला, 8 महिन्यांत केवळ 23 टक्के लाभार्थ्यांचं लसीकरण, शहराला आणखी 40 लाख डोसची गरज
कोरोना लसीकरणाला सुरूवात होऊन तब्बल 8 महिने होत आले तरी पुण्यात (Pune) केवळ 23 टक्के जणांचेच दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुण्याचं लसीकरण होण्यासाठी आणखी किती कालावधी जावा लागेल असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
पुणे : देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि तरूणांना लस देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाला सुरूवात होऊन तब्बल 8 महिने होत आले तरी पुण्यात (Pune) केवळ 23 टक्के जणांचेच दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पुण्याचं लसीकरण होण्यासाठी आणखी किती कालावधी जावा लागेल असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. (only 23% of people in Pune have completed both doses of corona vaccination in last 8 months)
लसींच्या पुरवठ्याअभावी लसीकरणाची गती कमी
गेल्या आठ महिन्यांमध्ये पुण्यात 197 दिवस लसीकरण झालं. त्यात 27 लाख 99 हजार 141 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. म्हणजे दिवसाला सरासरी 14 हजार 208 जणांना लस देण्यात आली. पुण्यात रोज किमान 50 हजार जणांना लस देण्याची क्षमता आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत एका दिवसात 27 हजार जणांना लस दिल्याचा सर्वाधिक आकडा आहे. असं असताना केवळ लसींच्या पुरवठ्याअभावी लसीकरणाची गती कमी होत आहे.
बहुतांश पुणेकर सरकारकडून मोफत मिळणाऱ्या लसीवरच अवलंबून
पुणे शहरात 34 लाख लोक लसीकरणासाठी पात्र आहेत. प्रत्येकाचे दोन डोस याप्रमाणे शहराला किमान 68 लाख डोसची आवश्यकता आहे. खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस उपलब्ध होत आहे. पण एका व्यक्तीच्या लसीकरणासाठी साधारण दीड हजार ते 1600 रुपयांचा खर्च आहे. एवढा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे बहुतांश पुणेकर सरकारकडून मोफत मिळणाऱ्या लसीवरच अवलंबून आहेत.
संपूर्ण लसीकरण होण्यास किती कालावधी लागेल हे सांगणं कठिण
लशीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना डेल्टा पासून जास्त संरक्षण मिळत नाही. त्यामुळे वेगाने लसीकरण करून दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. पण सध्याचा लसीकरणाचा वेग पाहाता संपूर्ण लसीकरण होण्यास किती कालावधी लागेल हे सांगणं कठिण आहे. सध्या पुणे शहरात किमान 34 लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. आतापर्यंत 28 लाख लोकांचा पहिला डोस झाला आहे. इतर नागरिकांचं लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी खास मोहीम राबवली जात आहे.
संबंधित बातम्या :