ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

ऑक्सिचेन अ‍ॅपमध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मागणी पुरवठा परिस्थिती अंदाज घेण्यासाठी आहे. | App for oxygen supply

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 4:07 PM

पुणे: जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे करण्यात आले. (Application for oxygen supply in Pune)

ऑक्सिचेन अ‍ॅपमध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मागणी पुरवठा परिस्थिती अंदाज घेण्यासाठी आहे. या ॲपमध्ये जिल्हयातील ऑक्सिजन उत्पादक, रिफिलर्स,वितरक आणि रूग्णालय यांचा समावेश आहे. ऑक्सिवीन अ‍ॅपमध्ये संग्रहित डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनवर आधारित डेटा तीन रंगाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केला आहे.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, हिराबाई बुटाला विचार मंचचे कौस्तुभ बुटाला व पदाधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करु नका; केंद्राच्या आदेशावर नवाब मलिक म्हणतात

केंद्र सरकार कोरोना लसीकरणाबाबतचा माहितीचा डाटा सार्वजनिक करु नका असे राज्यांना सांगत आहे. मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण (Vaccination) केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. ही माहिती लोकांपासून का लपवायची, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. (NCP Leader Nawab Malik on Modi govt vaccination policy)

किती लस आली, किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्र सरकारने दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

केंद्र सरकारने 12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. दहा दिवस उलटून अकरावा दिवस उजाडला तरी केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र सरकार फक्त घोषणा करते त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा डाटा सार्वजनिक करु नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. मात्र, हा दावा तथ्यहिन असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच’

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या फोटोला आक्षेप असल्याचं म्हटलं आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा

भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती

(Application for oxygen supply in Pune)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.