PDCC Bank Chairman : अजित पवार यांचं धक्कातंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी

अजित पवार यांनी प्रा. दिंगबर दुर्गाडे यांचं नाव निश्चित केलं आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.

PDCC Bank Chairman : अजित पवार यांचं धक्कातंत्र, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी
Ajit Pawar Digambar Durgade Sunil Chandere
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 1:36 PM

PDCC Bank Chairman पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडलीय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत होती. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार , माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) ही नावं चर्चेत होती. मात्र, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे (Digambar Durgade) यांचं नाव निश्चित केलं आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी  यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे (Sunil Chandere) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केलं आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवलंय.

अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी 1 तास बैठक

अजित पवार बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची बैठक संपली आहे. जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर सर्व संचालक निवडणुकीसाठी जिल्हा बँकेकडे रवाना झाले होते. एक तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुकांची मतं जाणू घेतली असल्याचं कळतंय.

पुणे जिल्हा बँकेवरील संख्याबळ

राष्ट्रवादी – 17 काँग्रेस – 02 भाजप – 02

संचालकपदी कोणाकोणाची बिनविरोध निवड?

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

इतर बातम्या:

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना ओमिक्रॉनचा कहर, कडक निर्बंध लागणार? अजित पवारांची तातडीची आढावा बैठक

पुणे जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक, आजी-माजी आमदार रेसमध्ये, अजितदादांसह संचालक मंडळाची बैठक

PDCC bank Chairman Election Ajit Pawar Elected Digambar Durgade as Chairman and Sunil Chandere vice chairman of Pune District Central Co Operative bank Election

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.