PDCC Bank Election | दत्तामामांचे ‘हुश्श..’, पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची "ब" वर्गातून बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

PDCC Bank Election | दत्तामामांचे 'हुश्श..', पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्यमंत्री भरणेही बिनविरोध
दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 9:40 AM

पुणे : ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne) यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील या महत्त्वाच्या जागाही आधीच बिनविरोध झाल्या आहेत.  अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

एकूण 123 उमेदवारांची माघार

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सात जागांसाठी आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत 123 उमेदवारांनी माघार घेतली. तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

भरणे-जगदाळे बिनविरोध

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची “ब” वर्गातून बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणाकोणाची बिनविरोध निवड

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचीही बिनविरोध वर्णी लागली.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. अखेरपर्यंत 123 उमेदवारांनी माघार घेतली.

निवडणूक कार्यक्रम

– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022

– मतमोजणी : 4 जानेवारी 2022

बँकेचे संचालक मंडळ : 21

– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13

– ब मतदार संघ : 1

– क मतदार संघ : 1

– ड मतदार संघ : 1

– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1

– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1

– विभक्त जाती व प्रजाती : 1

– महिला प्रतिनिधी : 2

संबंधित बातम्या :

Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान

PDCC Bank Election | काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादा-भरणेंची प्रतिष्ठा पणाला

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...