हातात तलवार, कुऱ्हाड घेऊन फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट अकलूजच्या तरुणांना महागात

हातात तलवार आणि कुऱ्हाड घेऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे अकलूजच्या तरुणांना चांगलंच महागात पडलंय.

हातात तलवार, कुऱ्हाड घेऊन फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट अकलूजच्या तरुणांना महागात
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 11:52 AM

अकलूज : हातात तलवार आणि कुऱ्हाड घेऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे अकलूजच्या तरुणांना चांगलंच महागात पडलंय. माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या सात तरुणांना पोलिसांनी चांगलाच घडा शिकवत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Photo with weapon in hand posted on social media Action taken By Akluj Police)

माळशिरस तालुक्यातील सात तरुणांना पकडून अकलूज पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पिसेवाडी येथील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे,  सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार सुरी, लाकडी दांडके घेऊन फोटो काढले होते आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.

सात तरुणांनी एकसाथ हातात शस्त्र घेऊन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सात पोरांचा नेमका इरादा काय होतं? हातात शस्त्रं घेऊन त्यांना नेमकं काय करायचं होतं? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. या तरुणांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच अकलूज पोलिसांनी ताबडतोब तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या सर्व तरुणांवर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

काही तरुण सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नसते उद्योग करतात. अशाच प्रसिद्धीच्या मानसिकतेतून तसंच ‘हवा’ करण्यासाठी काही तरुण सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन फोटो पोस्ट करत असतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसंच दहशत माजवणाऱ्या पोरांना धडा शिकवण्याचं आव्हान पोलिसांवर आहे. (Photo with weapon in hand posted on social media Action taken By Akluj Police)

हे ही वाचा

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

पुण्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.