आई-मुलाच्या संघर्षाची कहाणी; आर्थिक परिस्थितीमुळे इंग्लडमधील शिक्षणाला अडथळा

लहानपणीच त्याचे वडील त्याला आणि आईला सोडून निघून गेले (Story Of The Mother-Son Struggle). आईने कधी घरकाम करुन कधी पडेल ती कामे करुन त्याला सांभाळले.

आई-मुलाच्या संघर्षाची कहाणी; आर्थिक परिस्थितीमुळे इंग्लडमधील शिक्षणाला अडथळा
mother-son Struggle
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 1:50 PM

पिंपरी-चिंचवड : लहानपणीच त्याचे वडील त्याला आणि आईला सोडून निघून गेले (Story Of The Mother-Son Struggle). आईने कधी घरकाम करुन कधी पडेल ती कामे करुन त्याला सांभाळले. अखेर तिला महापालिकेच्या सुरक्षा विभागात मानधनावर काम मिळाले. त्याने ही आईचा संघर्ष लक्षात घेत मेहनत केली. त्याने बॅचलर इन फिजिओथेरपी केली. आता त्याला इंग्लंडमध्ये एक्सरसाईज अँड मेडिसीन या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळालाय. पण, पुढचा प्रवासही खडतर आहे. पाहुयात आई आणि मुलाच्या संघर्षाची कहाणी (Story Of The Mother-Son Struggle).

झोपडीतून मुलाच्या स्वप्नांना बळ

महापालिकेच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कल्पना आढाव या 20 बाय 20 च्या खोलीत मुलासोबत राहतात. पिंपरीमधल्या झोपडपट्टी मधून अशाच छोट्याश्या गल्लीतून या छोट्याशा खोली वजा घरात येतात. पण, याच झोपडीतून त्यांच्या मुलाच्या स्वप्नांना त्यांनी बळ दिलंय. त्यांचे पती त्यांचा मुलगा अमित लहान असतानाच दोघांनाही सोडून निघून गेले.

इंग्लंडच्या लीड बॅकेट्स या प्रसिद्ध विद्यापीठात संधी

नंतर त्यांनी कधी कुणाच्या घरी भांडी धुतली, पडेल ते काम केले आणि त्याला शिकवले. त्यानेही आईच्या कष्टाचे जाणीव ठेवली आणि बॅचलर इन फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता त्याला इंग्लंडच्या लीड बॅकेट्स या प्रसिद्ध विद्यापीठात स्पोर्ट्स एक्सरसाईज अँड मेडिसीन पदव्युत्तर शिक्षणासाठी संधी मिळालीय. त्याला प्रवेश मिळाल्याचा मेल ही आलाय. मात्र, हे शिक्षण घ्यायचे कसा असा त्याला प्रश्न पडलाय.

मुलाची आईला चांगले आयुष्य देण्याची धडपड पाहून अमितची आई गहिवरते. मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी अपेक्षा ती माऊली करतेय.

शिक्षणासाठी 21 लाखांची गरज

अमितला या शिक्षणासाठी 21 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज ही केलाय. पण घरची परिस्तिथी पाहता त्यांना ते मिळेल का यात शंकाच आहे. म्हणून 20 बाय 20 च्या झोपडी वजा खोलीत राहणाऱ्या अमितच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी काही जण पुढे यावेत हीच अपेक्षा.

Story Of The Mother-Son Struggle

संबंधित बातम्या :

आरोग्य विभागाच्या भरतीत परीक्षेआधीच सावळा गोंधळ, लाखो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.