जिथल्या नेत्यांनी साथ सोडली त्याच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा; अजित पवार म्हणाले, कुणावाचून कुणाचं नडत नाही…

Ajit Pawar Speech NCP Karykrta Melava : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कुणावाचून कुणाचं नडत नाही..., असं अजित पवार म्हणाले.

जिथल्या नेत्यांनी साथ सोडली त्याच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा; अजित पवार म्हणाले, कुणावाचून कुणाचं नडत नाही...
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 2:11 PM

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला. अनेक माजी नगरसेवकांनी ‘दादां’चा हात सोडत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. याच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी आज मेळावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल तर त्यांना समजावून सांगा. कोण काही येऊन सांगत असेल तर यांना फार काही शहराबद्दल जिव्हाळा आहे असं नाही, अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड आहे. कुणाचं कुणावाचून नडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं काही करू नका. आपल्याच पक्षाकडे राहा, असं अजित पवार कार्यकर्त्यांना सांगितलं.

डीपीडीसी बैठकीवर अजित पवार काय म्हणाले?

डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. काही जण दिवसा इकडे असतात रात्री तिकडे असतात, अशांनी तिकडे जायचे तर तिकडे जा, असं म्हणत अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

काही घडामोडी घडल्या, ज्याचा उल्लेख विलास लांडे यांनी केला. अनेकांना पद दिली, ताकद दिली. काही जण बाहेर चे होते त्यांच्यात वाद होऊ दिला नाही. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. काय घडलं, काय नाही या खोलात जात नाही, आम्ही अनादर करणारे लोक नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर

मी भेदभाव करणारा नेता नाही, विरोधकांना पण माहिती आहे, काल काही गोष्टी घडल्या, अडीच तास मीटिंग झाली. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकजण होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मावळमध्ये जास्त निधी दिला. यावर शेळके यांनी म्हटलं की तुम्ही सारखा हा उल्लेख करतायत. कुणाला दुखवायचं नाही. मी साहेबांचा अपमान केला नाही, सुप्रिया यांनी म्हटलं मी अपमान केला. हा आरोप म्हणजे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, असं अजित पवार म्हणाले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.