Pimpri Chinchwad byelection : नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, पुण्यात कोणी लावले बॅनर?

पिंपरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. परंतु हे बॅनर कोणी लावले? हे स्पष्ट झाले नाही. यापुर्वी पुणे शहरात कसबा पेठ मतदार संघात यासंदर्भात बॅनर लागले होते.

Pimpri Chinchwad byelection : नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, पुण्यात कोणी लावले बॅनर?
पिंपरी चिंचवडमध्ये लावण्यात आलेले बॅनर
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 1:01 PM

रणजित जाधव , पिंपरी-चिंचवड  : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र (Pimpri Chinchwad byelection)अखेरी स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आता होणार आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतला नाही. त्यामुळे तिरंगी लढत होणार असल्याने त्यांच्यांवर निशाणा साधला जात आहे.  पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून कलाटे यांच्या शिवसेनेतील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात एक पोस्टर झळकला. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असे बॅनप पुण्यात लागेल होते.

पुणे शहरातील फ्लेक्सबाजीचं लोण आता पिंपरी चिंचवडमध्ये ही आलंय. या फ्लेक्समधून महाविकासआघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यांवर निशाणा साधण्यात आलाय. ही बंडखोरी खोके घेऊन झाल्याचं त्यात म्हटलंय आहे. यातून त्यांची गुलामी अन गद्दारी समोर आल्याचं म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून…नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, एकदेव ओके डोक्यातून…खरा शिवसैनिक असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.

कोणी लावले बॅनर

पिंपरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. परंतु हे बॅनर कोणी लावले? हे स्पष्ट झाले नाही. यापुर्वी पुणे शहरात कसबा पेठ मतदार संघात यासंदर्भात बॅनर लागले होते. त्यामुळे या बॅनरमागे आहेत तरी कोण? हा शोध राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते घेऊ लागले आहे.

कलाटे यांचा निर्णय कायम

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कलाटे यांच्याशी गुरुवारी फोनवरून संवाद साधला होता. त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही अर्ज मागे घेण्याची कलाटे यांना विनंती केली. मात्र, कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. संभाजी ब्रिगेडने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु राहुल कलाटे यांनी माघार घेतली नसल्याने महाविकास आघाडीमधील मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फायदा भाजपला होणार आहे.

सचिन अहिर यांनी साधला संवाद

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले होते. त्यांनी तब्बल अर्धा तास राहुल कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.