Pune : 12 वर्षाचा मुलगा घरात, दार उघडेना, आई-वडील घराबाहेर कासावीस, शेवटी ‘तो’ निर्णय घ्यावा लागला

| Updated on: Aug 06, 2024 | 3:30 PM

घरात गाढ झोपत झोपलेल्या मुलाला उठविण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रिवर रोडवरील यशोमंगल हाऊसिंग सोसायटीमध्ये काल संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान ही घटना घडली.

Pune : 12 वर्षाचा मुलगा घरात, दार उघडेना, आई-वडील घराबाहेर कासावीस, शेवटी तो निर्णय घ्यावा लागला
12 वर्षाचा मुलगा घरात, दार उघडेना, आई-वडील घराबाहेर कासावीस
Follow us on

आपल्या घरातील एखादी व्यक्ती घरात गाढ झोपली आहे आणि आपण बाहेरुन येतो त्यावेळी आपण घरात प्रवेश करण्यासाठी बेल वाजवतो. किंवा घराच्या दरवाजाची कडी वाजवतो, अन्यथा दार ठोठावतो. पण घरात असलेली व्यक्ती प्रचंड गाढ झोपेत असली आणि तिला जाग येत नसली तर आपला जीव किती कासावीस होतो हे आपण शब्दांत सांगू शकत नाही. पिंपरी चिंचवडच्या शेवाळे दाम्पत्याला देखील याच कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. एक तास दरवाज्या खिडक्या ठोठावून आतमध्ये झोपलेला 12 वर्षांचा मुलगा दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर शेवाळे दाम्पत्य प्रचंड घाबरलं होतं. हे दाम्पत्य आपल्या मुलासाठी प्रचंड व्याकूळ झालेलं होतं. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेचं अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली.

यशोमंगल हाउसिंग सोसायटीत, तिसऱ्या मजल्यावर सचिन शेवाळे यांचं घर आहे. या घरात सचिन शेवाळे यांचा बारा वर्षाचा अथर्व शेवाळे हा मुलगा काल घरात कुणी नसताना गाढ झोपेत झोपलेला होता. सचिन शेवाळे हे घरी आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या दाराला ठोठावत, तसेच घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा गाढ झोपेतून उठतच नव्हता.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाची सुखरुप सुटका

आपल्या मुलाला काही बरं – वाईट तर झालं नाही ना, याची सारखी चिंता सचिन शेवाळे यांना भेडसावत होती. त्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला झालेला प्रकारची माहिती दिली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मशीनच्या मदतीने सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. यावेळी सचिन यांचा 12 वर्षाचा मुलगा गाढ झोपत होता. अग्निशमन दलाने अशाप्रकारे गाढ झोपेत असलेल्या मुलाची सुटका केलेली आहे. मुलगा गाढ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टकेचा श्वास घेतला.

दरम्यान, झोप ही प्रत्येकाला प्रिय असते. आपली झोप जितकी पूर्ण होते तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं. पुरेशी झोप घेतल्यानंतर आपण आपल्याला हव्या असलेल्या कामासाठी पूर्णवेळ झोकून देवून काम करु शकतो. सातत्याने काम केल्यामुळे आपलं शरीर थकतं. त्यामुळे झोप हा थकवा घालवण्यासाठीचा योग्य मार्ग आहे. याशिवाय झोप पूर्ण झाल्याने थकवा तर जातोच आणि मनही शांत होतं. त्यामुळे झोप पूर्ण होणं आवश्यक आहे. पण जास्त झोपही आपल्यालार आळशी बनवते. त्यामुळे 6 ते 8 तास झोप ही आपल्याला पुरेशी असते.