PCMC Encroachment : अनधिकृत पत्राशेड अन् बांधकामं हटवली; …तर कारवाई अधिक तीव्र करणार पिंपरी चिंचवड महापालिका

या कारवाईला अनेक व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे, तर ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मागील अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे.

PCMC Encroachment : अनधिकृत पत्राशेड अन् बांधकामं हटवली; ...तर कारवाई अधिक तीव्र करणार पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकामांवर कारवाईImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 10:30 AM

पिंपरी चिंचवड : रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून (Pimpri Chinchwad municipal corporation) कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेकडून रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, बांधकामांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पिंपळे गुरव (Pimple Gurav) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नाशिक फाटा ते पांजररपोळ, रावेत यादरम्यान ही रस्त्यांवरच्या अनधिकृत (Illegal) शेड, टपऱ्या आणि बांधकामांच्या उभारणीवर कारवाई करण्यात आली आहे. “ड” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पिंपळे गुरव प्रभाग क्र. 29 येथे काल (12मे) महानगरपालिकेची बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 42 पत्राशेड तसेच बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ 67 हजार चौ. फूट अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली आहे.

पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामे पाडली

पिंपरी चिंचवड पालिका अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी) क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. तर यानुसार ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पनवी नदीपात्रातील जाधवघाट रावेत येथील जवळपास 4119 चौरस मीटर अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. अशी 19 पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तर क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते पांजरपोळपर्यंत 61 मीटर रस्ता रुंदीतील दुतर्फा अतिक्रमणे काढली. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्य सुरक्षा महामंडळाचे 48 सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी सुरू केला विरोध

या कारवाईला अनेक व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे, तर ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच्या नोंदीही महापालिकेकडे होत्या. कोरोनाच्या कालावधीत या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थंडावली होती. आता पुन्हा महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे विरोध झाला तरी ही कारवाई सुरूच राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.