PCMC | पिंपरीत मालमत्ताधारक करतायत असा ‘बनावट’ पणा ; महानगरपालिकेने ‘इतक्या’ थकबाकीदारांना दिल्या नोटीस

महानगरपालिकेकडे कराचा भरणा करत असताना अनेक मी मिळकत धारकांकडून बनावट चेक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मिळकत धारकांकडून देण्यात आलेल्या धनादेश बँकेत वटत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अश्या मिळकत धारकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या करसंकलन विभागाने घेतला आहे.  

PCMC |  पिंपरीत मालमत्ताधारक करतायत असा 'बनावट' पणा ;  महानगरपालिकेने 'इतक्या' थकबाकीदारांना दिल्या नोटीस
Tax
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:04 PM

पिंपरी – पिंपरी-चिंचवड(Pimpri-Chinchwad) शहरात एकूण साडेपाच लाख मालमत्ता आहेत. या मिळकतींच्या करापोटी (Tax) महापालिकेच्या तिजोरीमध्ये वर्षाला नऊशे ते एक हजार कोटी रुपयांची रक्‍कम जमा होते. महानगरपालिकेला करापोटी मिळणारी रक्कम एक मोठे उत्पन्नाचे साधन आहे. यंदाही कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेनं मोठे मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना नोटीस दिल्या असून जप्तीच्या कारवाईला सुरूवात केली आहे. महापालिकेत एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर (Property tax)असलेल्यामध्ये 27 हजार 714 मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. यात औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहे. महापालिका करसंकलन विभागाने सुमारे 13 हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.

मालमत्ताधारकांची संख्या

करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 27 हजार 714 इतकी आहे. त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या 20 हजार 561 इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक 10 हजार 600, औद्योगिक 6 हजार 618 आणि मिश्र 3 हजार 343 थकबाकीदारांचा समावेश आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 4 हजार 153 इतकी आहे. त्यामध्ये निवासी 1 हजार 279, बिगरनिवासी 1 हजार 612, मिश्र 929 मालमत्ताधारक आहेत.

जप्तीचे नियोजन  

महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने करवसुलीसाठी मोहीम राबवत असतानाच दुसरीकडे पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मधील मॉलवर जप्तीची कारवाई केली आहे. तर भोसरी येथील हॉटेल साईनाथ सील करण्यात आले आहे . एवढंच नव्हे तर आज (1 मार्च )पासून16 झोनमध्ये जप्ती करणार असल्याचे विभागाने स्पष्ट केलं आहे. सातत्याने नोटीस देऊनही कर भरत नसल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

अशी केली जातेय फसवणूक

महानगरपालिकेकडे कराचा भरणा करत असताना अनेक मी मिळकत धारकांकडून बनावट चेक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मिळकत धारकांकडून देण्यात आलेल्या धनादेश बँकेत वटत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अश्या मिळकत धारकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेच्या करसंकलन विभागाने घेतला आहे.

Video – अमरावतीमध्ये चोरट्यांनी फोडल्या दोन बँका! तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

Nashik | येवल्यातील कारागीराने पैठणी साडीवर साकारलं महादेवाचे चित्र

बायकोच्या मदतीने 21 वर्षीय प्रेयसीची हत्या, मृतदेह नदीत फेकला, पती-पत्नीसह तिघांना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.