Kishor Aware : किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याची दोघांनी केली तयारी, प्लॅन तयार केला, पण…

Kishor Aware Murder : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यात आले आहे. परंतु या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. दोघांना किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी केली होती.

Kishor Aware : किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याची दोघांनी केली तयारी, प्लॅन तयार केला, पण...
kishor awareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:13 AM

मावळ, पुणे : पुणे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. त्याचा सूत्रधार कोण होता, हत्या का झाली? हे सर्व स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रकरणाला पुन्हा नाट्यमय वळण मिळाले आहे. किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी दोघांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सर्व प्लॅन तयार केला होता. परंतु या प्लॅनला अंतिम टप्पा देण्यापूर्वी पोलिसांनी आपली कामगिरी बजावली अन् आरोपी जाळ्यात आले.

काय होता प्लॅन

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची १२ मे रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर, संदीप मोरे यांच्यासह एकूण सात आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा सूत्रधार माजी नगरसेवक गौरव खळदे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणासाठी गठीत केलेल्या एसआयटीने आपला सर्व तपास पूर्ण केला. परंतु आता या प्रकरणात हत्येचा बदला हत्येने घेण्याचा प्रकार होत होता. किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी करणाऱ्या प्रमोद सांडभोर आणि शरद साळवे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली.

हे सुद्धा वाचा

पिस्तूल काडतुसे जप्त

पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवे या दोघांना अटक केली. त्यांच्यांकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यांच्यांकडे चार पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली आहे. प्रमोद सांडभोर हा तळेगाव येथील आहे. तो जमिनीचे व्यवहाराचे कामे करतो. तर शरद साळवे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. एका हत्येचा प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला आहे. आता या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांचा प्लॅन काय होता? कधी करणार होते हत्या? कोणाची हत्या करणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी मिळवली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.