PM Modi : सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची ‘चिपळी’ केली, मोदींकडून शिवाजी महाराज, वीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख

आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडघडणीतील संतांचे योगदान समजावून सांगितलं आहे. तर यावेळी मोदींनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा अर्थ समजावून शांगताना समानतेचा आणि एकतेचा दाखलाही दिला आहे. 

PM Modi : सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची 'चिपळी' केली, मोदींकडून शिवाजी महाराज, वीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेख
सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची 'चिपळी' केली, मोदींकडून शिवाजी महाराज, वीर सावरकरांचा गौरवपूर्ण उल्लेखImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 4:06 PM

पुणे : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)आज एका कार्यक्रमासाठी देहूमध्ये (Dehu) आले होते. त्यांनी यावेळी तुकारामांच्या (Tukaram Maharaj) अभंगांचा अर्थ सांगण्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतिर्थाच्या विकासापर्यंत सर्व मुद्द्यावर भाष्य केलं. याच वेळी मोदींनी तुकारामांच्या अभंगाचे महत्व सजावून सांगताना सावरकरांनीही जेलमध्ये बेड्यांची ‘चिपळी’ केली, स्वातंत्र्यांच्या लढाईत सावरकरांंना जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा ते जेलमध्ये तुकारामांचे अभंग वाचायचे असे म्हणत गौरवपूर्ण उल्लेख सावरकरांचा केला होता. तसेच मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकारामांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. म्हणत आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडघडणीतील संतांचे योगदान समजावून सांगितलं आहे. तर यावेळी मोदींनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचा अर्थ समजावून शांगताना समानतेचा आणि एकतेचा दाखलाही दिला आहे.

बाबासाहेबांच्या पंचतीर्थांचा विकास होतोय

विविधतेने जगत असताना भारत हजारो वर्ष जागृत राहिला आहे. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपल्या परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. आता अधुनिकता ही भारताची ओळख बनू लागले आहे. पालखी मार्गाचा विस्तार होत असला तरी अयोध्येतही राम मंदिर बनत आहे. पूर्ण देशात तीर्थक्षेत्रं आणि पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. या आठ वर्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांचा विकास होत आहे. ही पंचतीर्थ नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत, असेही मोदी यावेळी म्हणले आहेत.

कठीण काळात संतांनी योग्य मार्ग दाखवला

तर कठीण काळात तुकारामांनी त्यांची संपत्ती दान केली. जो भंग नाही होत, जो वेळेसोबत जीवंत राहतो, तो अभंग असतो. संत चोखामेळा यांच्या प्राचीन अभंगातून आम्हाला पेरणा मिळते. सार्थ अभंगगाथेने या संत परिवाराची वर्षानुवर्षेची अभंगरचना सोप्या भाषेत सांगितली आहे. समाजात उच नीच हा भेदभाव हे खूप मोठं पाप आहे. त्यांचा उपदेश हा राष्ट्रभक्तीसाठी मोठा आहे. असे सांगतानाच सरकारी योजनेचा लाभ हा सर्वासाठी विनाभेदभाव मिळतो, असे मोदींनी बजावलं आहे. तर पंढरीची वारी ही समानतेचं प्रतीक राहिली आहे, असे म्हणत मोदींनी वारीचा उल्लेख केला आहे. देहू भारताच्या सांस्कृतिक भविष्याला मजबूत करत आहे. तर मी मंदिर न्यास आणि भक्तांचे आभार मानतो, तुकामाराम महारांच्या गाथांना माझा प्रणाम, असे म्हणत मोदींनी काही अभंग म्हणून दाखवले आहेत.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....