PM Modi Pune Visit : पुणे शहरात विरोधकांचे आंदोलन, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, आमदार ताब्यात

PM Narendra Modi Pune Visit: : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहे. यावेळी विरोधकांनी आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदारास अटक केलीय.

PM Modi Pune Visit : पुणे शहरात विरोधकांचे आंदोलन, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, आमदार ताब्यात
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:37 AM

पुणे |1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु केले आहे. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे भाजपने या आंदोलनास उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

पुणे मोठा बंदोबस्त

पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन अन् विरोधकांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधकांनी पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन सुरु केले आहे. मोदी यांनी मणिपूर विषयात चूप्पी तोडावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोहचलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमच्या नेत्यांना अटक केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ईशारा महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे. पुण्यातील अंबिल ओढा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी म्हटले की, मणिपूर जळत असताना सत्कार अन् पुरस्कार कसले स्वीकारताय. आम्ही मोदी यांच्या या दौऱ्यास विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून होणाऱ्या आंदोलनामुळे पुणे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांना सोमवारीच नोटीसा बजावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार ही नोटीस बजावली होती.

भाजपचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चांगल्या कार्यक्रमासाठी येत आहेत. परंतु त्यांना राजकीय विरोध करायचा अशी भूमिका जर घेतली तर भाजपा सुद्धा आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गालबोट लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.