PMP Bus Day Pune : पुणेकरांच्या आवडत्या PMPचा आज बस डे, महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा आज बस डे आहे. आज पाच मार्गांवर लेनद्वारे बस सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास 1800 बसेस आज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास मिळणार आहे.

PMP Bus Day Pune : पुणेकरांच्या आवडत्या PMPचा आज बस डे, महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी
पीएमपीएमएल (संग्रहित छायाचित्र)
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:37 AM

पुणे : पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीचा आज बस डे आहे. आज पाच मार्गांवर लेनद्वारे बस सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास 1800 बसेस आज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. महिलांना आज दिवसभर मोफत प्रवास मिळणार आहे. आजच्या बस डेच्या निमित्ताने किमान तिकीट दर हा 5 रुपये असणार आहे. पीएमपीएमएल (PMPML) एक अनोखी सेवा (Service) यानिमित्ताने पुणेकरांना देत आहे. बस डेच्या (Bus day) या उपक्रमासाठी वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्याकडून पीएमपीला सहकार्यही मिळत आहे. उद्या म्हणजेच 19 एप्रिलला पीएमपीचा वर्धापनदिन आहे. त्याच्या आदल्या दिवशी पीएमपीकडून बस डे साजरा करण्यात येतो. यासाठी पीएमपीने खर्चही केला आहे. त्यामुळे या अनोख्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पीएमपी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

‘या’ मार्गांवर धावणार विशेष सेवा

– जंगली महाराज रस्ता – फर्ग्यूसन कॉलेड रस्ता – कोथरूड डेपो ते डेक्कन – स्वारगेट ते शिवाजी नगर – शिवाजीनगर ते स्वारगेट (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्ग)

कोण ठरणार भाग्यवान?

पीएमपी आजच्या दिवशी एक लकी ड्रॉ काढणार आहे. या लकी ड्रॉनुसार प्रथम विजेत्याला एक वर्षाचा मोफत प्रवास करता येणार आहे. एक वर्षाचा पास त्याला दिला जाईल. तर दुसऱ्या विजेत्याला सहा महिने आणि तिसऱ्या विजेत्याला ज्यात 14 जण असतील, त्यांना तीन महिने मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या लकी ड्रॉमध्ये प्रवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने या बस डेचे आयोजन पीएमपीतर्फे करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

आणखी वाचा :

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे जेव्हा फोटोग्राफर बनतात आणि निघते रथातून मिरवणूक!

Pune NCP : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कसली कंबर; अॅपही केलं लॉन्च!

Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.