गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज? नेमका प्रकार काय?

आमच्या जागेत कार्यक्रम होता. आम्हाला न विचारता मारहाण का केली, असा आरोप युवकांनी केला. यामुळे कार्यक्रमातील नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावेळी पोलिसांकडून चक्क महिलेवर लाठीचार्ज? नेमका प्रकार काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 8:36 PM

सुनील थिगडे, प्रतिनिधी, पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काही ना काहीतरी गोंधळ होत असतो. गौतमीच्या नावावर हजारो लोकं कार्यक्रमाला येतात. या लोकांना सांभाळणे पोलिसांच्या नाकीनऊ येते. काही युवक कार्यक्रमात हुल्लडबाजी करतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमात राडा हे जणू समीकरण झालंय. अशीच एक घटना जुन्नर तालुक्यात घडली. कार्यक्रमात हुल्लडबाजी केली, म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पण, आम्हच्या जागेत कार्यक्रम होता. आम्हाला न विचारता मारहाण का केली, असा आरोप युवकांनी केला. यामुळे कार्यक्रमातील नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.

युवकांचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न

आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रत्येकवेळी काही ना काही राडा होत असतो. जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या गौतमी पाटील हिच्या डिजे शो कार्यक्रमात अनेकवेळा काही युवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

मात्र येथील खुडे कुटुंबातील नयन खुडे आणि त्यांचा भाऊ तसेच त्यांच्या आईवर पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप खुद्द नयन खुडे आणि त्याच्या भावाने आणि आईने केला आहे.

आमच्याच जागेत आम्हाला मारहाण का?

ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे ती जागा आमच्या मालकीची आहे. आम्हाला साधं विचारलं देखील नाही. या कारणावरून त्यांनी हातात ज्वलनशील द्रवरूप इंधन बाटलीमध्ये घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून पोलिसांनी त्यांना मार दिला असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला.

कार्यक्रमातील लोकांना सांभाळणे खूप कठीण असते. अशावेळी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागतो. कधीकधी गैरसमजातूनही असे प्रकार होतात. पोलीस म्हणतात, युवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला. पण, युवकांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला विचारपूस करता का मारहाण केली, असं युवकांचं म्हणण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.