Pune spa : स्पा सेंटरमध्ये काळे धंदे! पुण्यातल्या औंधमध्ये पोलिसांनी टाकला छापा; एका मॉडेलसह सहा जणींची सुटका
मागील काही दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज सेंटर, स्पाचे पेव फुटले आहे. यातील अनेक ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात याच स्पा सेंटरमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला होता.
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यातील औंध परिसरातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत हे मसाज सेंटर आहे. या मसाज स्पा सेंटरवर काल सायंकाळी पुणे पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर (Prostitution) पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. यात एकूण 6 आरोपी असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आणखी पाच आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. यात एकूण एका मॉडेलसह एकूण सहा पीडित महिलांची सुटकादेखील करण्यात आली आहे. पुण्यातील औंध (Aundh) परिसरात पुणे पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभागाने ही मोठी कारवाई केली. एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर हा स्पा थाटण्यात आला.
मसाज सेंटरचे फुटले पेव
मागील काही दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात मसाज सेंटर, स्पाचे पेव फुटले आहे. यातील अनेक ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात स्पा सेंटरमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली होती. तर थायलंडमधील चार महिलांसह सहा महिलांची सुटका करण्यात आली होती. एका गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पथकाने एका फसव्या ग्राहकाला औंध येथील ऑरा थाई स्पामध्ये (Aura Thai spa) पाठवले होते. या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी स्पावर छापा टाकला होता. त्यानंतर व्यवस्थापकाला अटक केली होती.
पिंपरी चिंचवड परिसरात धाडी
पुण्यातील विमाननगर, कोरेगाव पार्क त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड, औंध, वाकड यासह पुण्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांत अशाप्रकारचे गुन्हे घडल्याचे स्पष्ट होत आहे. वाकडमधील कस्पटे वस्तीत काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ट्रॅको ट्रीट स्पावर कारवाई केली होती. पिंपरीतील ग्रीन विलेज स्पा त्याचबरोबर जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रूफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती.