Pune : तब्बल 200 जणांवर पोलीस करणार तडीपारीची कारवाई! पुण्यातल्या बारामती, इंदापुरात अवैध धंदे करणाऱ्याचं धाबं दणाणलं

बारामती उपविभागातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारू विकणाऱ्या 20 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईसाठी यादी बनविण्यात आली आहे. एकूण 150 दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

Pune : तब्बल 200 जणांवर पोलीस करणार तडीपारीची कारवाई! पुण्यातल्या बारामती, इंदापुरात अवैध धंदे करणाऱ्याचं धाबं दणाणलं
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बारामतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:45 AM

बारामती, पुणे : बारामती (Baramati) आणि इंदापूर तालुक्यातील दोनशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली आहे. अवैध दारू विक्री प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची कुंडली पोलिसांनी तयार केली असून यापुढील काळात अवैध व्यवसाय (Illegal activity) करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. त्याअंतर्गत या दोनशे जणांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू (Liquor) विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले याच्याविरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धावे दणाणले आहे.

प्रकाश चैनसिंग नवलेवर 25 गुन्हे दाखल

प्रकाश चैनसिंग नवले याला या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली आहे. वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी नवले याच्याविरोधातील प्रस्ताव तयार केला होता. नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देत नवले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवले याला येरवडा कारागृहात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

150 दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई

बारामती उपविभागातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारू विकणाऱ्या 20 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईसाठी यादी बनविण्यात आली आहे. एकूण 150 दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक लांडे यांच्यासह उपनिरीक्षक योगेश शेलार, सलीम शेख, हवालदार महेश बनकर, रमेश नागटिळक, दीपर वारुळे, अमोल भोसले, नितीन बोराडे, महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, प्राजक्ता जगताप यांच्या पथकाने एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार केला.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.