Video: रस्त्यावरचं गँगवार आता राजकारणातही; पुण्यातील राजकारण बदलतय, आंबेकरांच्या प्रकरणानंतर भाजपचंही प्रत्युत्तर

पुणेः राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये (BJP and NCP) सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थेट हाणामारीपर्यंत (Politics clashesh) पोहचले आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात गँगवारने डोकं वर काढलं होते. एकमेकांवर तुटून पडणे, एकमेकांच्या गँगमधील लोकांवर बदला घेणे, तिच परिस्थिती सध्या […]

Video: रस्त्यावरचं गँगवार आता राजकारणातही; पुण्यातील राजकारण बदलतय, आंबेकरांच्या प्रकरणानंतर भाजपचंही प्रत्युत्तर
भाजपा प्रवक्ते विनायक आंबेकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 7:09 PM

पुणेः राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये (BJP and NCP) सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थेट हाणामारीपर्यंत (Politics clashesh) पोहचले आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात गँगवारने डोकं वर काढलं होते. एकमेकांवर तुटून पडणे, एकमेकांच्या गँगमधील लोकांवर बदला घेणे, तिच परिस्थिती सध्या राजकारणात दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आंबेकरांना मारहाण झाली नंतर…

तर दुसरीकडे आंबेकर यांच्या मारहाणीनंतर भाजपनेही राष्ट्रवादीला प्रत्युत्तर मारहाणीनेच दिले आहे. राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना माराहन केली होती त्या अप्पा जाधव यांना भाजप कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या कार्यलयात जाऊन मारहाण केली.

राजकारणाचे हे चित्र उदासवाणे

सधाच्या काळात बदलत्या राजकारणाचे हे चित्र उदासवाणे आहे मात्र  क्रियेला प्रतिक्रिया मिळत असल्याने एकमेकांवर हल्ला करणे, बदला घेणे हे प्रकार सध्या वाढतच आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण तर सध्या बदलतं आहे असंच वाटू लागले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे चित्र वाढत जात असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत.

मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण

दरम्यान भाजपने मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मारहाणीमागचं कारण पोलिसांनी शोधून काढावं अशी मागणी आता भाजपने केली आहे.

महापालिका निवडणुकांचे वारे

महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तशा गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र हा संघर्ष माराहणीपर्यंतच थांबला तर बरं होईल अन्यथा शहरातील यापुढील चित्र भयावह असणार यात शंका नाही.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....