पुण्यात 23 गावांच्या समावेशावरुन राजकारण तापलं, राष्ट्रवादी भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या 23 गावांवरून आता राजकारण चांगलंच तापलंय.(Pune New 23 Villages)
पुणे: राज्य सरकारच्यावतीनं पुणे महानगरपालिकेत 23 गावांच्या समावेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या 23 गावांवरून आता राजकारण चांगलंच तापलंय. 2022 च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळलीय. तर, सत्ताधारी भाजप मात्र गावांच्या समावेशाआधी विकासनिधी देण्याची मागणी करतेय. यामुळे गावांच्या समवेशावरून पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू झालाय. (Politics start between BJP and NCP on inclusion of 23 villages in PMC )
महापौरांची विकास निधीची मागणी
पुणे महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश करून 2022 च्या महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मोठी राजकीय खेळी केलीय. राष्ट्रवादीनं नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी या गावांचा समावेश केल्याचा आरोप करत भाजपने केलाय. याशिवाय गावांच्या समावेशआधी पालिकेला 9 हजार कोटींचा विकासनिधी देण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय आरोप फेटाळले
पुण्यात आता 23 गावे समाविष्ट होणार असली तरी तेथील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे साडेपाच लाख आहे. त्यामुळे पुण्यात पाच ते सहा नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पुण्याची एकूण नगरसेवकांच्या संख्या ही 169 ते 170 पर्यंत राहू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीने राजकीय हेतूने निर्णय घेतला नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितलं आहे.
नव्या 23 गावांच्या समावेशाने पुण्याचे क्षेत्रफळ 485 चौरस किलोमीटर होणार आहे. त्यामुळे मुंबईला मागे टाकत पुणे हे आकाराच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे.
नव्याने समाविष्ट होणारी गावं
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
पुणे महापालिकेचा विस्तार
१९९७ मध्ये सुमारे २५० चौरस किलोमीटर
२०१७ मध्ये ३३१.५७ चौरस किलोमीटर
प्रस्तावित नवीन २३ गावांतील क्षेत्रफळ १८४.६१ चौरस किलोमीटर
पुण्याची प्रस्तावित हद्द ५१६.१८ चौरस किलोमीटरपर्यंत
अनधिकृत बांधकामांचा प्रश्न
उच्च न्यायालयानं पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात यावा, असा आदेश दिला आहे. याआधी समावेश करण्यात आलेल्या 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. तसंच पायाभूत सुविधांचीही मोठी वानवा आहे. खडकवासला गावाला धरण उशाला असूनही प्यायला पाणी मिळत नाही, असं हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सांगितले आहे. 23 गावांच्या कृती समितीनं शासन निर्णयाचं स्वागत करतानाच तक्रारींचा लांबलचक असा पाढाच वाचला आहे.
दरम्यान, याआधी सरकारने 11 गावांचा समावेश पुणे महापालिकेत केलाय. त्यांच्यापर्यंत अद्याप विकास पोहचला नाही, पुन्हा आता नव्याने 23 गावांचा समावेश केल्याने पुणे महापालिकेवर मोठा ताण वाढणार आहे.
Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी#pune #pmc #ncp #Bjp #Punenew23villages @BJP4Maharashtra @NCPspeaks @mohol_murlidhar @AjitPawarSpeaks https://t.co/kpPbEhpEyB
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
संबंधित बातम्या
Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
(Politics start between BJP and NCP on inclusion of 23 villages in PMC )