Breaking News: पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातली लाईट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत

नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे अशी माहिती पाणीपुरवठा विभाग, सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली आहे.

Breaking News: पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातली लाईट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत
पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही शहरात आज पाणी तसच वीज पुरवठा विस्कळीत असणार
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:00 AM

पुणे – पिंपरी चिंचवड  शहरासाठी (Pune Pimpri Chinchwad) मोठी बातमी आहे. कारण दोन्ही शहरातल्या जनतेला आज पाणी पुरवठा (Water supply) तसच वीज संकटाला (Power crisis) सामोरं जावं लागणार आहे. रावेतच्या 400 KV विद्युत केंद्रात तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वीज पुरवठा गायब आहे. लाईटच नसल्यामुळे दोन्ही जुळ्या शहरातल्या पाणी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झालाय. विशेषत: रावेतमधून पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा होता. त्यामुळे त्या शहरातल्या अनेक भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. तसच दोन्ही शहरातून पहाटेपासूनच लाईट गायब आहे. त्याचाही परिणाम शहरातल्या पाणी पुरवठ्यावर होण्याची चिन्हं आहेत.

काय आहे पाणी पुरवठा विभागाचा संदेश?

पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांचा एक मेसेज प्राप्त झाला आहे. त्यात ते म्हणतात,

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे.

पूर्ण पुण्यातून वीज गायब

पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे तर पुण्यातून पहाटेपासूनच वीज गायब आहे. हाती आलेल्या माहितीनुसार

1.स्वारगेट

2. वारजे

3. कर्वेनगर

4. कोथरुड

5. शिवाजीनगर

6. विश्रांतवाडी

7. टिंगरेनगर

8. बाणेर

9. धायरी

10. सेनापती बापट रोड

अशा अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

कधीपर्यंत सुरळीत होणार?

संपूर्ण पुणे जिल्ह्यातूनच लाईट गायब आहे. त्यामुळे तिच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीनं देण्यात आलीय. सकाळी 11 पर्यंत वीज पुरवठा सुरु होईल अशी माहिती मिळतेय. पण झालेला बिघाड मोठा असल्यामुळे काही वेळ मागे पुढे होऊ शकते. ते गृहीत धरुनच पुणेकर तसेच पिंपरी चिंचवडकरांनी आजचं नियोजन करायचं आहे. वीज पुरवठाच गायब असल्यामुळे पाणी पुरवठ्याचेही तीन तेरा वाजलेले आहेत. त्यामुळे जे काही पाणी असेल ते दोन्ही शहरातल्या नागरिकांनी जपून वापरायचं आहे. वीज जरी आली तरी पाणी पुरवठा व्हायला वेळ लागू शकतो हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा:

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

पुणे विद्यापीठाच्या शांतीश्री धुलीपुडी पंडिंत यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड, पहिल्या महिला कुलगरु होण्याचा बहूमान

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.