शहरातील नालेसफाईच्या कामांचा पुणेकरांना ताप
दरवर्षी कोटय़वधी रुपये या कामांसाठी खर्च केले जात असतानाही ही कामे अपूर्णच राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. | drainage cleaning work
योगेश बोरसे, पुणे: पुणे शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह अन्य काम यंदाही कागदावरच राहिली आहेत. महापालिका प्रशासनाने 70टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कामे अपूर्ण असल्याने यंदाही पावसाळ्यात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपये या कामांसाठी खर्च केले जात असतानाही ही कामे अपूर्णच राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. (Pre monsoon drainage cleaning work in Pune)
शहरात मागील दोन वर्षांपासून जोरदार पावसामुळे पूर येत आहे. या पुराला निकृष्ट दर्जाची नाले सफाई, ओढ्या-नाल्यांमधील केवळ कागदोपत्रीच काढला जाणारा गाळ, ठेकेदारांची कमी कामात अधिक फायदा लाटण्याची कार्यपद्धती आदी कारणे कारणीभूत आहेत. नाल्याची काम पावसाळापूर्व करणं गरजेचं होतं ती अजून झाली नाहीत . ड्रेनेज लाईन खोदून ठेवल्यामुळे पाणी जाणार कसं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळापूर्व कामे अपूर्ण राहिल्याने सत्ताधारी भाजपवर विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत अपूर्ण कामे असतानाही प्रसासनांकडून कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
एप्रिल महिन्यात महापालिकेकडून या प्रकारची कामे सुरू केली जातात. नालेसफाई, खोलीकरण, रुंदीकरण, चेंबर दुरुस्ती आणि साफसफाई, कल्व्हर्ट,पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता अशी कामे केली जातात. मात्र ही कामे पूर्ण झालेली नसल्याची वस्तुस्थिती आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामे रखडली आहेत. साधारणपणे 10 जूनपर्यंत ही कामे होतील, असा दावा केला जातोय.
आंबिल आणि भैरोबा नाल्याचे काम अपूर्ण
सध्या आंबिल ओढ्याचे खोलीकरण आणि साफसफाईची काही ठिकाणची कामे झाली आहेत. आंबिल ओढय़ाची एका ठिकाणी सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू झाले आहे. भैरोबा नाला येथील कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मात्र महापालिकेचा हा दावा पावसात वाहून जाण्याची शक्यता अधिक आहे. शहरात 236 लहान मोठे नाले आहेत. त्यांची एकूण लांबी 526 किलोमीटर एवढी आहे. यामध्ये समाविष्ट 11 गावातील 166 किलोमीटर लांबीच्या नाल्यांचा समावेश आहे. तर उर्वरित 170 किलोमीटर लांबीचे नाले शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत आहेत.
शहरातील एकूण नाल्यांपैकी 28 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता करणे आव्हानात्मक आहे. मात्र पुणेकरांना जो मनस्ताप होतोय तो लवकरात लवकर कमी करावा हि पुणेकरांची माफक अपेक्षा आहे.
पुण्यातील नाल्याची स्थिती?
नाले –526 किलोमीटर लांबीचे
कामे पूर्ण- 300 किलोमीटर लांबीची
चेंबर- 40हजार
स्वच्छता – 3 हजार
पावसाळी गटारे- 145किलोमीटर लांबीची
कामे पूर्ण- 100 किलोमीटर लांबीची
कल्व्हर्ट- 300
स्वच्छता- 200
(Pre monsoon drainage cleaning work in Pune)