वसंत मोरे यांची ‘फिलिंग’ इमोशनल;शहराध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे यांची फेसबूक पोस्ट; राजकीय वातावरणात रंग भरणार

वसंत मोरे यांच्या या पोस्टमुळे आता मनसेमध्ये  राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वसंत मोरे यांना मनसे शहराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर साईनाथ बाबर त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. त्यानंतर काही तासातच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

वसंत मोरे यांची 'फिलिंग' इमोशनल;शहराध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे यांची फेसबूक पोस्ट; राजकीय वातावरणात रंग भरणार
मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना हटवल्यानंतर फेसबूक पोस्टImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:50 AM

पुणेः राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मशिदीवरच्या भोंग्याच्या निर्णयाविरोधात वक्तव्य केल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात मत मांडलं होतं. गुरुवारी वसंत मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन (Pune President) दूर करण्यात आले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी आज फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुकवरील त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी फिलिंग इमोशनल असं म्हणत ‘मी आजच साहेबांच्या हस्ते उदघाटन केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच…’ या आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे.

वसंत मोरे यांच्या या पोस्टमुळे आता मनसेमध्ये  राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वसंत मोरे यांना मनसे शहराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर साईनाथ बाबर त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. त्यानंतर काही तासातच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पुणे महानगरपालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भविष्यात फायदा होणार की तोटा होणार या विषयी आता तर्क वितर्क लढविले जात आहेत.

पक्षाविरोधात भूमिका म्हणून…

राज ठाकरे यांनी ज्यावेळेपासून मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केले आहे. त्यावेळेपासूनच वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले. त्यांना त्या पदावरुन हटवले गेले असल्यामुळे भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला बसणार याचं उत्तर आता येणारा काळच देणार आहे.

भोंग्याविषयी नाराजीचा सूर

पुण्यामध्ये सध्या मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक आहेत. शहराध्यक्ष पदावरुन मोरे यांना हटवल्यानंतर आता ही जबाबदारी साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आली आहे. मोरे आणि बाबर ज्या कात्रज आणि कोंढव्यामध्ये नगरसेवक आहेत. या दोन्ही प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची मतं जास्त आहेत. मोरे यांचा जो प्रभाग येतो त्यामध्येही मुस्लिम मतं जास्त असल्यामुळे मशिदीवरच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त करुन त्याला विरोध केला होता. वसंत मोरे यांनी मनसेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांनी फेसबुक पोस्ट करत फिलिंग इमोशन असं म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमंत्रण

मनसेच्या मशिदीवरील भुमिकेनंतर होत असलेल्या राजकारणामुळे अनेक घडामोडी घडत आहेत. पूर्वी मनसेत असलेल्या रुपाली पाटील यांनीही वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टला त्यांच्या समर्थकांनी उत्तर दिले आहे. भावी आमदार तुम्हीच असल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या 

IPL 2022, Orange Cap : बटलरला धोका, ऑरेंज कॅपमध्ये डिकॉकची आगेकुच, पर्पलच्या यादीत उमेश ‘राज’ कायम

देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा ! सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका

नाशिक-पुणे रेल्वेच्या भूसंपादन दरात शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने; 3 वर्षांच्या खरेदी पटीत दर कमी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.