PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीक्षेत्र देहूतील आपल्या भाषणातून ‘या’ पाच अभंगांचा केला उल्लेख
पंतप्रधान मोदी विविध विकासकामांबद्दल बोलताना म्हणाले की योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. सरकार गरिबांसाठी योजना राबवते आहे. 100 ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत
देहू – पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्याहस्ते श्री क्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकरी (Warkari)संप्रदायांतील वारकऱ्यांना व उपस्थित लोकांना संबोधित केले. या संबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. आपल्या भाषणातून देशातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासाची माहिती सांगत असतानाच मोदी यांनी देहूतील श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज (Shri Sant Jagadguru Tukaram Maharaj)व वारकरी सांप्रदायातील संतांचे महत्त्व व त्यांनी केलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अनेक अभंगांच्या पंगतीचाही उल्लेख केला. आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी यांनी उल्लेखलेल्या भाषणाच्या पंगती खालील केलेल्याप्रमाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री क्षेत्र देहू येथील आपल्या भाषणाची सुरुवात. या संत निळोबारायांच्या गाथेचे पारायण सुरू करण्यापूर्वी म्हणावयाच्या मंगलने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
श्री विठ्ठलाय नम, नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदिपा.. नमो सद्गुरू सच्चिदानंद रूप.. नमोसद्गुरू भक्त कल्याण मूर्ती.. नमो सदगुरु भास्करापूर्ण कीर्ती, ज्ञानमूर्ती.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देहू क्षेत्राच्या महिमा वर्तन करताना त्यांनी खालीलअभंग म्हणत केला
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।। धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे । उच्चारिती नामघोष ।।
यानंतर मोदी यांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी संत तुकारामांचा हा अभंग सादर करत, त्यांच्या उपदेशाचं महत्त्व सांगितले.
उंच नीच काही नेणे भगवंत | तिष्ठे भावभक्ती देखोनियां ||१|| दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी | दैत्या घरी रक्षी प्रसादासी ||२||
संत तुकाराम महाराज यांनी आपल्या शिकवणीतून समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी शिकवण दिली त्या अभंगाचे सादरीकरणही मोदी यांनी केले. यावेळी ते म्हणाले की संत तुकाराम म्हणत उच्च-नीचचा भेदभाव करणे हे पाप आहे. हा उपदेश तितका उपयुक्त धर्मासाठी तितकाच राष्ट्रभक्तीसाठीही आहेच. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतो. त्यातूनच सरकारच्या योजनांचा विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे.
जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले ||१|| तो चि साधु ओळखावा | देव तेथे चि जाणावा ||२||
पंतप्रधान मोदी विविध विकासकामांबद्दल बोलताना म्हणाले की योग्य दिशेने प्रयत्न केले तर असंभवही संभव होऊ शकेल. सरकार गरिबांसाठी योजना राबवते आहे. 100 ट्क्कयांपर्यंत त्या पोहचावयच्या आहेत. यावेळी तुकारामांच्या या अभंगाचा उल्लेख केला.
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।