कोविड, एच 1 एन1, एच3एन2 च्या संसर्गाबाबत, आरोग्य मंत्र्याने दिले महत्वाचे आदेश…

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभाग तसेच खाजगी रुग्णालयातील लॅब या सर्वांनी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड, एच 1 एन1, एच3एन2 च्या संसर्गाबाबत, आरोग्य मंत्र्याने दिले महत्वाचे आदेश...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 9:16 PM

पुणे : राज्यातील कोविड 19, एच 1 एन 1, एच 3 एन 2 च्या वाढत्या संसर्गाबाबत आढावा घेण्यासाठी आज 6 एप्रिल रोजी आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून कोविड 19, एच1एन1, एच3एन2 च्या वाढत्या संसर्गाबाबत रोजची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हानिहाय माहिती देण्याचे आदेशही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत.

केरोना कालावधीतील कोविड रुग्णालयातील सर्व साधने व्हेंटीलेटर, आरटीपीसीआर टेस्टींग किटस्, औषधे, कुशल मनुष्यबळ, ऑक्सीजन या बाबींची उपलब्धता तसेच या गोष्टी कार्यरत स्थितीत असाव्यात याची यंत्रणेमार्फत खात्री करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना अनुषंगाने आवश्यक असणारा जिनोम सिक्वेंसिंग रिपोर्ट प्राप्त होण्यात जास्त दिवसांचा कालावधी लागत आहे. तरी कोरोनाचे रिपोर्ट 5 दिवसांच्या आत राज्य आरोग्य विभागास प्राप्त होण्यासाठी योग्य ती पावले उचलून पाठपुरावा करण्यात यावा असंही यावेळी सांगण्यात आले आहे.

कोविड 19 एच 1एन 1, एच3 एन2 ची लागण झालेलया रुग्णाच्या नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येवून संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या असंही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभाग तसेच खाजगी रुग्णालयातील लॅब या सर्वांनी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आढावा बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभगाचे सचिव वीन सोना, आयुक्त धिरज कुमार, संचालक पुणे डॉ.नितीन आंबाडेकर, संचालक मुंबई डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक राज्य कुटुंब कल्याण कार्यालय रघुनाथ भोई, संचालक डॉ. बबीता कमलापूरकर तसेच कोविड , गोवर टास्कफोर्स मधील डॉ.सुभाष साळुखे उपस्थित होते.

महाराष्ट्रात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून राज्याचे आरोग्य मंत्री परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोविडच्या कार्यकाळातील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.