Pune accident : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर खांबाला आदळला वाळू वाहतूक करणारा ट्रक, सुदैवानं जीवितहानी टळली
एक हायवा ट्रक नगरहून आळेफाट्याकडे जाताना बोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या (Transformer) खांबावर जाऊन आदळला व पलटी झाला. त्यामुळे वीजपुरवठा (Power supply) खंडित झाला.
जयवंत शिरतर, पुणे : वाळू वाहतूक व उपसा करण्याला बंदी असतानाही ही वाळू येतेच कुठून व जाते कुठे व कोणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नंबर नसलेल्या व भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू भरलेल्या वाहनांमुळे कल्याण-अहमदनगर महामार्ग हा दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. आज (दि. 22) मंगळवारी सकाळी सकाळीच एक हायवा ट्रक नगरहून आळेफाट्याकडे जाताना बोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या (Transformer) खांबावर जाऊन आदळला व पलटी झाला. त्यामुळे वीजपुरवठा (Power supply) खंडित झाला. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. महावितरण (MSEDCL) कंपनीचे कर्मचारी वेळेवर हजर झाल्याने त्यांनी या खांबावरचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला. परंतु यावेळी या हायवा ट्रकच्या जवळून जाणारे दुचाकीरील दोघेजण मात्र थोडक्यात बचावले.
मोठा अनर्थ टळला
जवळच एक विद्यालय आहे. भरण्यास वेळ असल्याने याठिकाणी शाळकरी मुलांची गर्दी नसल्याने फार मोठा अनर्थ टळल्याचे आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या ठिकाणी वाळूच्या गाड्यांना उभे राहण्यासाठीचा नाका असल्याने या रस्त्यावरून जाणारे नागरिक आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करतात.
Pune : वाळूची वाहतूक करणारा विनानंबरचा ट्रक महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आदळला! पाहा व्हिडिओ – #truck #ACCIDENT #Pune #Police #MSEDCL #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/IXAclKByUB
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2022
महसूल व पोलीस खात्याला कल्पना नाही?
अपघात झाल्यानंतर अगदी काही वेळातच एक जेसीबी, दोन क्रेन, एक रिकामा हायवा, एक ट्रॕक्टर घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक हलविण्याचे काम करण्यात आले. तर महसूल व पोलीस खात्याला याची काहीही खबर नसल्याचे दिसते.