Ajit Pawar at Pune | मानाच्या गणपतींना मानाचं स्थान द्याच, पण… ; गणेशोत्सवाच्या बैठकीत अजित पवार यांची महत्वाची सूचना

Ajit Pawar on District Level Ganeshotsav Planning Meeting : गणेशोत्सवासाठी दोन दादांनी पुण्यात घेतली बैठक; काय निर्णय झाला? अजित पवार यांनी सविस्तर सांगितलं... तसंच सरकारकडून निवडक गणेश मंडळांच्या कामाचं कौतुक केलं जाणार आहे. त्यात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

Ajit Pawar at Pune | मानाच्या गणपतींना मानाचं स्थान द्याच, पण... ; गणेशोत्सवाच्या बैठकीत अजित पवार यांची महत्वाची सूचना
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:49 PM

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. पुण्यात आज जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते. गणेशोत्सव, नियमावली, गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. यात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मानाच्या गणपती मानाचे गणपती आहेत पण इतर मंडळाना पण चांगली वागणूक पोलिसांनी दिली पाहिजे. कुणाच्याही मनात दुरावा निर्माण होऊ नये. सर्व सूचना आम्ही घेतल्या आहेत. सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.

पुण्यात झालेल्या जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन बैठकीत काय चर्चा झाली. याची अजित पवार यांनी माहिती दिली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अनेक प्रश्नांची उत्तर देण्याचं काम केलं. उत्तर देण्याचं काम केलं आहे. गुजरातमधल्या कॉन्फरन्सला न जाता या बैठकीला आलो आहे. सगळ्याना उभं राहावं लागलं, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. निवडणुकिला उभं करणं वेगळं, अशी मिश्किल टिपण्णीही अजित पवारांनी केली.

पुणे शहर ,पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा, त्याच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला गेला. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकत्रितपणे ही बैठक घेतली. या बैठकीला पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल देखील उपस्थित होते. .पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आज पार गणेशोत्सवा संदर्भातली महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील मुद्द्यांची माहिती दिली.

उत्सुक गणेश मंडळाला राज्य सरकार पुरस्कार देणार आहे. 44 मंडळांना सरकार पुरस्कार देणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर 5 सप्टेंबरपर्यत अर्ज दाखल करून जास्तीत जास्त गणेश मंडळाने सहभागी व्हावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदांबाबत वेगवेगळी मतं आहेत. कचरापेट्या वापरण्यापेक्षा टाक्या वापराव्यात. अशी चर्चा झाली. याची काळजी घ्यावी. त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना अजित पवारांनी व्यवस्थआपन मंडळाला दिल्या आहेत. दहीहंडी उत्सवासाठीही उत्साह वाढला आहे. आता यात पण साहसी खेळ म्हणून परवानगी दिली आहे. याबाबतीत पण काही असेल तर सांगावं, असंही अजित पवारांनी सुचवलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.