शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजितदादांचं प्रत्युत्तर; म्हणाले, काही लोक…

Ajit Pawar on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीवर बोलताना विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. शरद पवार यांनी मोदींवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर....

शरद पवारांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला अजितदादांचं प्रत्युत्तर; म्हणाले, काही लोक...
शरद पवार, अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 1:54 PM

नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील. त्याचसाठी भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी हे 400 पारचा नारा देत आहेत, असं विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. पवारांसोबतच विरोधी पक्षातील इतर नेतेही हीच टीका करताना दिसतात. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील… असं काहीही म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. ते पुण्यात बोलत होते.

“देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक”

लोकांनी अनेकदा आम्हाला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एकंदरीत राजकीय कल बघता मुरलीधर मोहोळ चांगल्या मतांनी निवडून येण्यास काही अडचण येणार नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे,कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय, असंही अजित पवार म्हणाले.

सगळीकडे साथ हवी- अजित पवार

काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. फोन करतील… पण त्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय. खेळात वाद नको. पैलवानांची आम्हाला पुणे जिल्ह्यातील चार ही लोकसभेत हवी आहे. मी काय फक्त बारामती… बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असं अजित पवार म्हणाले.

जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे. तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुलगुरूंची नेमणूक केलेली आहे. मला तुमची सर्व मतदारसंघात मदत पाहिजे. मी इकडे काय बारामती, बारामती करायला आलो नाही, मला सर्व ठिकाणी तुमची मदत पाहिजे, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.