अजितदादांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात; दौरा अन् लोकांच्या भेटीगाठी
Ajit Pawar Wife Sunetra Pawar in Wagholi Today : सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मैदानात; महिला वर्गाशी संपर्क वाढवण्यासाठी सुनेत्रा पवार यांची नवी रणनिती... आज सुनेत्रा पवार दौरा करणार आहेत. स्थानिकांशी संवाद साधणार आहे. तसंच लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. वाचा...
योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काल निकाल आला. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारण घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका खासदाराला एक चॅलेंज दिलं. ते चॅलेंज होतं, की कोणताही उमेदवार उभा करेन पण निवडून आणेल! अजित पवारांनी हे चॅलेंज दिलं होतं, खासदार अमोल कोल्हे यांना… शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करून तो निवडून आणू, असं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत.
सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये
शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत. शिरूर मतदारसंघात येणाऱ्या पुण्यातील वाघोली भागात सुनेत्रा पवार यांनी दौरा केला. तिथल्या स्थानिकांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
वाघोलीत भेटीगाठी
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके आणि माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवास यांनी सदिच्छा भेट दिली. संक्रातीनंतर होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. या भागातील विविध कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजर राहत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित अनेक हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी स्थानिक महिलांशी त्यांनी संवाद साधला. या भेटीगाठींमधून त्या महिलांशी संपर्क वाढवत आहेत.
अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढणार?
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिल्यानंतर पवार कुटुंब अॅक्टिव्ह मोडमध्य पाहायला मिळत आहे. पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार शिरुर लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढणार आहे.