कामाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, पुण्याच्या तरुणीचा अंगावर वीज कोसळून मृत्यू
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खडकी भोरदरा येथे 19 वर्षीय मुलींच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला आहे.

पुणे : हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खडकी भोरदरा येथे 19 वर्षीय मुलींच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला आहे. मीरा सखाराम लोहकरे असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
सांयकाळी 7 च्या सुमारास घटना घडली
काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. त्यात त्याठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होता त्यामुळे मीरा लोहकरे हिच्या वडिलांनी तिला चालत जाण्यास सांगितले. मीरा काही अंतर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
कामाचा पहिला दिवस ठरला शेवटचा
कालच मीरा लोहकरे ही मंचर मधील एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली होती. काल तिचा कामाचा पहिलाच दिवस होता. घरातील तरुण मुलीच्या जाण्याने लोहकरे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
6 ऑक्टोबरला दौंडमध्ये वीज कोसळली
पुण्यातील दौंडमध्ये एका घरावर वीज दृश्य कँमेऱ्यात 6 ऑक्टोबरला कैद झाली होती. दौंड शहरातील बालाजी नगर या ठिकाणी वीज पडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार
प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या:
विदर्भात यंदा पावसाची तुफान बॅटिंग, 103 टक्के पाऊस, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?
Pune Ambegaon Meera Lohakare died due to Lightening Strike