अमित शाह म्हणाले, दादा दीर्घकालावधीनंतर तुम्ही योग्य जागेवर, अजित पवार यांनी काय दिले प्रत्युत्तर

Amit Shah and Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथमच अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर आले. यावेळी अमित शाह यांनी अजित पवार यांचा सुरुवातीलाच उल्लेख करत उशीर केल्याचे सांगितले.

अमित शाह म्हणाले, दादा दीर्घकालावधीनंतर तुम्ही योग्य जागेवर, अजित पवार यांनी काय दिले प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 1:55 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 6 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये येऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या कालावधीत त्यांनी अनेकवेळा केंद्रीय गृहमंत्री अन् भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. परंतु दोन्ही प्रथमच एका सार्वजनिक कार्यक्रमाला एकत्र आले. अमित शाह यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या अंतरराजीय डिजिटल पोर्टलचे उद्घाटनकेले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे अमित शाह यांनी अजित पवार यांचा सुरुवातीलाच उद्घाटन करत ती आठवण करुन दिली.

अजितदादा उशीर केला

भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यांचा सोबत माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार यांना एक सांगतो, दीर्घ कालावधीनंतर आपण योग्य ठिकाणी बसला आहेत. तुमची हीच जागा योग्य होती. मात्र आपण खूप उशीर केला. अमित शाह यांनी ही वक्तव्य करताच व्यासपीठावर बसलेले अजित पवार यांनी लागलीच प्रत्युत्तर दिले. आपले दोन्ही हात जोडून त्यांनी नमस्कार केला. यावेळी सभागृहात हशा आणि टाळ्या झाल्या.

२०१९ ची आठवण

हे सुद्धा वाचा

अजित पवार यापू्र्वी २०१९ मध्ये भाजपसोबत आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. या सर्व घडामोडींमागील चाणक्य अमित शाह असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु शरद पवार यांनी चक्र फिरवली अन् अजित पवार काही तासांत पुन्हा स्वगृही आले. तिच आठवण अमित शाह यांनी अजित पवार यांना तर करुन दिली नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

अमित शाह यांच्याकडून सहकाराचे कौतूक

अमित शाह यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे कौतूक केले. अमित शाह म्हणाले की, देश एका बाजूला आहे, अन महाराष्ट्र एका बाजूला. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलोय.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.