AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा हे राष्ट्रवादीतील एकमेव नेते, जे…; अमृता फडणवीस यांच्याकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक

Amruta Fadnavis on Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावेत, याविषयी मी काही म्हणणार नाही. ते ज्या स्थानावर आहेत. तिथं ते सर्वस्व झोकून काम करतात. त्यात मला समाधान आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात. अमृता फडणवीस यांच्याकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक, म्हणाल्या...

अजितदादा हे राष्ट्रवादीतील एकमेव नेते, जे...; अमृता फडणवीस यांच्याकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 4:42 PM

पुणे | 25 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते जे आहेत. ते चांगलं काम करत आहेत आणि सध्या ते भाजपसोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या युती सरकारकडून चांगली कामं होत आहेत आणि येत्या काळातही होत राहतील, असा विश्वास आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

मी कुठल्याही पदासाठी देवेंद्रजींचा विचार करत नाही. ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल काम करत आहेत. 2024 मध्ये भाजप एक नंबर पार्टी होवो. हीच प्रार्थना देवाकडे केली. अजून त्रिदेव राज्यात आहेत. समोर मी त्यांच्या पाठीशी आहे. पर्सनली त्यांच्या पाठीशी आहे. एकमेव अजितदादा हे राष्ट्रवादीतील नेते आहेत.जे चांगलं काम करत आहेत. ते आता आपल्याकडे आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी देशसेवेचं व्रत घेतलेय. त्यासाठी ते जे काही करत आहेत. त्या गोष्टी पूर्ण होवोत, असं गणरायाला साकडं घातलं.  राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवारच काम करतात. ते आमच्याकडे यावेत असं मला वाटत होतं आणि ते आलेही. याचा आनंद आहे. सध्या युती सरकार चांगलं काम करत आहे, असं अमृता यांनी म्हटलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते प्रशासनाच्या मागे लागून काम करत आहेत. ते काय बोललेत मला माहिती नाही, असं त्या म्हणाल्या.

दोन दिवसाआधी नागपुरात आलेल्या पुरावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. नागपूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला. इतक्या मोठ्या पावसाला सामोरं जाण्याची नागपूरची तयारी नव्हती. मात्र भविष्यात असं घडायला नको. यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही, नद्या प्रदूषित व्हायला नको. नागपूरमध्ये पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी नियोजन करणं ही तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.