पुणे आरटीओची धडक कारवाई, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांकडून केला मोठा दंड वसूल

Pune News : बुलढाणा येथे ३० जून रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियम मोडणाऱ्या बसेसवर जोरदार कारवाई सुरु केले आहे.

पुणे आरटीओची धडक कारवाई, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांकडून केला मोठा दंड वसूल
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 12:27 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : बुलढाणा येथील सिंदखेड राजाजवळ ३० जून रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. खासगी ट्रॅव्हलच्या बसच्या झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. या अपघातानंतर खासगी बसेस आणि प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक विभागाने नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवाशी वाहतुकीवरील कारवाई तीव्र केली आहे. त्यासाठी विशेष तपासणी मोहीमसुद्धा सुरु केली आहे.

काय सुरु आहे कारवाई

पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहर आणि जिल्ह्यातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु केली आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सचा आपत्कालीन दरवाजा, वेग नियंत्रक उपकरणाची आरटीओकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई केली जात आहे.

आतापर्यंत किती बसेसवर कारवाई

पिंपरी चिंचवड आरटीओकडून खासगी बसेसची तपासणी सुरुच होती. त्यासाठी दोन वायूवेग पथकांनी निर्मिती केली होती. या वायूवेग पथकाने ४५ दिवसांत १४६ बसेसवर कारवाई केली आहे. पथकाने ४५ दिवसांत ३६३ प्रवासी बसेसची तपासणी केली. यामध्ये एकूण १४६ वाहने दोषी आढळली. त्यांना १२ लाख ६५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. बुलढाणा अपघातानंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. राज्यभरातील खासगी कंत्राटी प्रवासी बसेस तपासणीची विशेष मोहीम परिवहन विभागाकडून हाती घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरातून सुटणाऱ्या बसेची तपासणी

पुणे शहरात राज्यभरातून नागरिक येतात. अनेक जण नोकरीसाठी येत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. या मार्गावर रेल्वेची संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्सने वाहतूक सुरु असते. यामुळे  सर्व ट्रॅव्हलची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.