पुण्याच्या लष्करी अधिकाऱ्यांने बनवले असे काही की मोदी यांनी घेतली दखल, आता सीमेवर होणार तैनात

दिल्लीमध्ये झालेल्या इंडियन आर्मी आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेत या प्रणालीस नावजले गेले आहे. आता लवकरच या प्रणालीचा समावेश भारतीय लष्करात होणार आहे.

पुण्याच्या लष्करी अधिकाऱ्यांने बनवले असे काही की मोदी यांनी घेतली दखल, आता सीमेवर होणार तैनात
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:14 PM

पुणे : पुणे तेथे काय उणे नेहमीच म्हटले जाते. कारण विद्येचे माहेरघर असणारे पुणे देशात सर्वच गोष्टींत आघाडीवर आहे. पुण्यातील शिक्षणापासून उद्योगापर्यंत सर्वच गोष्टींचा डंका देश-विदेशात सुरु आहे. पुण्यातील अनेक तरुण प्रशासकीय सेवेतच नाही तर देशाच्या लष्करात उच्च पदावर आहे. आता पुण्यातील आणखी एका लष्करी अधिकाऱ्यांने आपल्या कार्यामुळे भारतीय लष्करासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आता त्यांचे संशोधन भारतीय सीमांवर तैनात करण्यात येणार आहे.

लष्कर प्रमुखांकडून झाले कौतुक

हे सुद्धा वाचा

चीन असो की पाकिस्तान यांच्या कारवाया नेहमीच सुरु असतात. या दोन्ही देशांकडून अतिरेकी कारवायांसाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो. परंतु भारतीय सीमेचा भूभाग मोठा असल्याने या ड्रोनच्या हालचाली नेहमीच टिपता येत नाहीत.

आता पुणे येथील वाघोलीत राहणारे लेफ्टनंट कर्नल सदानंद चौहान यांनी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान एखाद्या जॅमरसारखे काम करणार आहे. एअरो इंडियामध्ये दाखवलेल्या या संशोधनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. तसेच लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनीही या संशोधनाचे कौतुक केले.

काय आहे तंत्रज्ञान

चौहान यांनी तयार केलेली प्रमालीचे नाव सध्या ‘फिल्ड डिप्लोएबल सॅटेलाइट नेव्हिगेशन स्नुपिंग सिस्टीम’ आहे. ही प्रणाली जॅमरसारखे काम करत आहे. लवकर या प्रणालीचे नवीन नामकरण करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शत्रूचे ड्रोन भारतीय हद्दीत निकामी ठरणार आहे. या प्रणालीची यशस्वी चाचणी दक्षिण सीमेवर झाली आहे.

कोण आहेत सदानंद चौहान

सदानंद चौहान पुणे येथील वाघोलीत रहिवासी आहेत. ते सध्या महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेनिलकॉममध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एमटेक प्रकल्पातंर्गत दीड वर्षांच्या प्रयत्नाने ही अँटी ड्रोन प्रणाली तयार केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या इंडियन आर्मी आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेत या प्रणालीस नावजले गेले आहे. आता आर्मी डिझाइन ब्युरोद्बारे येत्या तीन महिन्यात ही प्रणाली कार्यन्वीत करण्यात येणार आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.