Pune Honey Trap : दोन वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर एटीएसचा मोठा निर्णय

Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरण आता गंभीर होऊ लागले आहे. या प्रकरणी डीआरडीओ संचालकास अटक झाल्यानंतर आता हवाई दलातील एक अधिकाऱ्याचाही सहभाग आढळून आला आहे.

Pune Honey Trap : दोन वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर एटीएसचा मोठा निर्णय
drdo scientist
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 10:59 AM

पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले. एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतच हवाई दलाचा एक अधिकारी देखील हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो सध्या बंगळुरुमध्ये आहे. कुरुलकरनंतर शेंडे अशी दोन प्रकरणे उघड झाल्यानंतर पुणे एटीएसने मोठा निर्णय घेतला आहे. कुरुलकर याची पोलीस कोठडीत वाढली असताना त्याची पॉलीग्राफी चाचणी निर्णय घेण्यात आला आहे.

पॉलीग्रॉफी चाचणी होणार

DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलीग्राफी टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. एटीएसला टेस्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. काल पुणे न्यायालयाने कुरुलकरला एक दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

दोघांना एकाच आयपीवरुन मेसेज

प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडे दोन वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी एकाच आयपी ॲड्रेसवरुन मेसेजेस आले होते. या दोघांमध्ये काही संभाषण देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने आता तपास देखील सुरु आहे. तपासासाठी हवाई दलाची एक टीमही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर आलीय.

असे आले दुसऱ्या अधिकाऱ्याचे नाव

प्रदीप कुरुलकर याचा one plus 6T हा मोबाईल एटीएसने ताब्यात घेतला. तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. पण तो डीकोड झाला नव्हता. तो एटीएसकडे पाठवण्यात आला. मग पुन्हा प्रदीप कुरुलकर यांच्यासमोर डीकोड करण्यात आला. मोबाईलमध्ये जे स्क्रिनशॉट काढण्यात आले होते त्यामध्ये एक लिहिलं होतं की, प्रदीप तू मला ब्लॉक का केलं आहेस? हा मेसेज निखिल शेंडे याच्या मोबाइलवरुन गेला होता. पोलिसांच्या तपासानंतर ते स्पष्ट झाले.

पॉलीग्राफ चाचणी काय

पॉलीग्राफी चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाची गती यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि या डेटाचा वापर व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी केला जातो. दुसरीकडे, नार्को टेस्टमध्ये व्यक्तीची आत्मभान कमी होते ज्यामुळे तो मोकळेपणाने बोलू शकतो.

ही ही वाचा

पुणे डीआरडीओ संचालकाने पाकिस्तानाला पुरवली गुप्त माहिती, एटीएसला तपासात काय काय मिळाले?

पुणे डीआरडीओ संचालक हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, फॉरेन्सिक अहवालातून मिळाली महत्वाची माहिती

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.