जेवढ्या मोदींच्या सभा होतील, तेवढं आमची लीड वाढेल; काँग्रेस नेत्याला विश्वास
Congress Leader Atul Londhe on Narendra Modi and BJP : काँग्रेस नेत्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना त्यांनी काँग्रेसच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या सभांवर भाष्य करतानाच त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. वाचा सविस्कर...
देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. नरेंद्र मोदीदेखील ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यावर काँग्रेस नेत्याकडून भाष्य करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या जेवढ्या सभा होतील. तेवढे आमचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडणून येतील. मोदींची सभा झाली की धांगेकर जास्ती मतांनी निवडून येतील हे नक्की आहे. जेवढ्या मोदींच्या सभा होतील तेवढी आमची लीड वाढेल. रविंद्र धंगेकर आता १ लाखाने जिंकणार असतील तर मोदींच्या सभेनंतर 2 लाखाच्या लीडने जिंकतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
महायुतीवर निशाणा
देशात काँग्रेसची लाट पहिल्या टप्प्यात भाजपचा पराभव झालेला दिसत आहे. राज्यातल्या (विदर्भ)झालेल्या पाचही जागा काँग्रेस जिंकत आहे. नागपुरात देखील नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित आहे. अनेक नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. दिलेलं एकही आश्वासन यांनी पूर्ण केलं नाही. केवळ जातीय दंगली भाजपने पेटवल्या. राज्यात ही निवडणूक गद्दार विरूद्ध खुद्दर अशी होणार आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प या सरकारने घालवला. असे अनेक प्रकल्प राज्यबाहेर गेले ते यांच्यामुळेच अजित पवार यांना 4 जागा देखील नीट दिल्या नाहीत. आता एक होते अजित दादा अशी परिस्थिती निर्माण होईल, असं असं अतुल लोंढे म्हणालेत.
रवींद्र धंगेकर सामान्य माणसाशी जोडले गेले आहेत. लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. अनेक वर्षे त्यांनी काम केलं आहे. धंगेकर यांनी कसब्याच्या निवडणूकीत स्थायी समितीचे सदस्य रासनेंना पाडलं. धंगेकर या निवडणुकीत महापौरांना पाडतील, असंही अतुल लोंढे म्हणालेत.
सांगलीत कोण जिंकणार?
चंद्रपुरात आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. नागपूर आणि चंद्रपूर कलेक्टर यांच्या विरोधात FIR दाखल करणार हे अस कुणीही करू शकत नाहीत, असं अतुल लोंढेंनी म्हटलं. तर सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीचा विजय होईल. आम्ही चंद्रहार पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असं अतुल लोढेंनी म्हटलं.