दुर्दैवी! राजगुरुनगरमध्ये चालू शर्यतीत बैलाचा पाय मोडला; सिंधुदुर्गातील घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना
खेड तालुक्यातील पांगरी येथील रोकडोबा महाराज यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत अनेक बैलगाड्यांनी सहभागही घेतला. ही स्पर्धा नागरिकांच्या उत्साहात सुरुही झाली मात्र काही क्षणातच स्पर्धेत भाग घेतलेल्या बैलाचा अपघात झाला आणि बैलाचा पाय मोडला.
पुणेः बंदी असलेल्या बैलगाडा स्पर्धेला न्यायालयाकडून सुरु करण्यात आल्यानंतर राज्यातील अनेक शेतशिवारातून बैलगाडा स्पर्धा पुन्हा जोमाने सुरु झाल्या आहेत. ज्या प्राणी संघटनेने (Animal Association) प्राण्यांचे हाल होतात, बैलांना मारहाण होते आणि जखमी होतात याबाबत तक्रार करुन या स्पर्धांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र ही बंदी नुकतीच उठली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागात बैलगाडी स्पर्धा (Bailgada Sharyat) भरवण्यात आल्या. तर अल्पावधितच बैलगाडा स्पर्धा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसात सिंधुदुर्गात जिल्ह्यात बैलांच्या झुंज लावण्याचा खेळ करण्यात आला, त्या झुंज लावल्यानंतर बैलांच्या झुंजीत एका बैलाचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस तक्रारही तक्रार झाली आहे. या घटनेनंतर आता, पुणे (Pune) जिल्ह्यात बैलगाडा स्पर्धेदरम्यान बैलाचा पाय मोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बैलगाडा स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खेड तालुक्यातील पांगरी येथील रोकडोबा महाराज यात्रा उत्सवात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत अनेक बैलगाड्यांनी सहभागही घेतला. ही स्पर्धा नागरिकांच्या उत्साहात सुरुही झाली मात्र काही क्षणातच स्पर्धेत भाग घेतलेल्या बैलाचा अपघात झाला आणि बैलाचा पाय मोडला. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर काही वेळ बैलगाडा स्पर्धा थांबवण्यात आली मात्र तासाभरानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आली.
बैलाला गंभीर दुखापत
बैलगाडा शर्यत सुरु झाल्यानंतर धावणाऱ्या बैलांचा अचानक अपघात झाला. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर आणि बैलाचा पाय मोडल्यानंतरही शर्यतीतील धुरेकरी बैल निशान्यापर्यंत पोहचले मात्र या बैलाला गंभीर दुखापत झाली आहे.
कोकणात बैलाचा मृत्यू
अपघात झाल्याने दोन बैलांपैकी एका बैलाचा पाय मोडल्याची माहिती देण्यात आली आहे. बैलगाडा स्पर्धेला नुकतीच परवानगी मिळाली आहे, मात्र काही दिवस होण्याआधीच बैलगाडा स्पर्धेत बैलांना दुखापत होणे, बैलांच्या झुंज लावल्यानंतर बैलाचा मृत्यू होणे अशा घटना घडत असल्याने बैलगाडा स्पर्धा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Pune Cyber Crime | लग्न करण्याच्या बहाण्याने महिलेने तरुणाला लावला 9 लाखांना चुना